Ahilyanagar News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई आयोजित “नाट्य परिषद करंडक” (Theatre Council Trophy) या भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील (One-act Play Competition) प्राथमिक फेरीचे उद्घाटन (Opening) अहिल्यानगर केंद्रावर (Ahilyanagar Centre) पार पडले. या उद्घाटन प्रसंगी शाखाध्यक्ष अमोल खोले आणि प्रसाद बेडेकर, सागर मेहेत्रे, जालिंदर शिंदे,अनंत जोशी, प्रसाद भणगे व परीक्षक प्रमोद लिमये आणि विनोद राठोड हे उपस्थित होते.
नक्की वाचा : जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?
करंडकमध्ये १२ संघ सहभागी (Ahilyanagar News)
महाराष्ट्रातील हौशी, प्रायोगिक कलावंतांना रंगमंच उपलब्ध व्हावा, नवोदित कलाकारांमध्ये नाट्यकलेची ओढ निर्माण व्हावी, तसेच राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळावी, याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील सर्व केंद्रांवर एकूण २५२ संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविलेला आहे.अहिल्यानगर केंद्रावरून या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले असून छत्रपती संभाजीनगर येथील तीन तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी येथील प्रत्येकी एका संघाचा या स्पर्धेत समावेश आहे.
अवश्य वाचा : “मनोज जरांगे यांनी कागद अन् पेन घेऊन सरकार समोर आरक्षणाबाबत चर्चेला बसावं”- चंद्रकांत पाटील
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत होणार (Ahilyanagar News)
“नाट्य परिषद करंडक” स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रसाभिनय, अहिल्यानगर,(एकांकिका – देखावा),नाटकंती, अहिल्यानगर,(Tackk), होप फौंडेशन अहिल्यानगर (सेकंड चान्स,आपलं घर, अहिल्यानगर(कोंधट), रंगविहार, अहिल्यानगर (झिम पोरी झिम…) नटेश्वर कला व क्रीडा मंडळ, राहुरी (गुण्या गोवींदाणे) नाट्य मंडळी,छत्रपती संभाजीनगर (परतलेले घरकुल),लोकसाहित्य प्रकाशन, छ. संभाजीनगर (सावळा), नाट्य दर्शन, छत्रपती संभाजीनगर (बुजगावणं), एस.एस.टी.आयुर्वेद महाविद्यालय, संगमनेर (Dissection), संकल्पना फौंडेशन, कोपरगांव (ये साली जिंदगी), वात्सल्य प्रतिष्ठान, अहिल्यानगर (नथिंग टू से) या १२ एकांकिका आज स्पर्धेमध्ये सादर होणार आहेत.
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईतील माटुंगा येथील दि. १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्य संकूल येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल खोले यांनी केले. तर स्पर्धेविषयी माहिती जालिंदर शिंदे यांनी दिली तर आभार प्रदर्शन आणि प्रसाद बेडेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत जोशी यांनी केले.