Ahilyanagar News:अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार 

0
Ahilyanagar News:अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार 
Ahilyanagar News:अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार 

नगर : महावितरण कंपनीकडून अहिल्यानगर शहर (Ahilyanagar News) पाणी पुरवठा योजनेकरिता होणाऱ्या वीज पुरवठ्यात बिघाड निर्माण झाल्याने सोमवारी (ता. १२) रात्री ११.३० वाजल्यापासुन आज (ता. १३) पहाटे ४.३० वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित (Power Supply Interrupted) झालेला होता. त्यामुळे शहरात आगामी दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत (Water supply will be disrupted for two days) राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

नक्की वाचा: मोठी बातमी!राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या  

सलग आठ तास पाणी उपसा बंद  (Ahilyanagar News)

वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर तीन तासांनी पुर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरु झाला. सलग आठ तास पाणी उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी (ता.१३) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी आदी भागात महापालिके मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणी पुरवठा हा बुधवारी (ता. १४) करण्यात येईल.

अवश्य वाचा:  सोने-चांदीचे दर पुन्हा कडाडले! जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर…  

‘या’ भागात उशिराने पाणीपुरवठा  (Ahilyanagar News)

तसेच बुधवारी (ता. १४) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, आदी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो गुरुवारी (ता.१५) करण्यात येईल. तसेच सर्व उपनगर भागामध्ये रोटेशन पेक्षा उशीराने पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.