Ahilyanagar Yuva Sansad : ‘अहिल्यानगर युवा संसदे’तून विद्यार्थ्यांनी घेतले लोकशाहीचे धडे

Ahilyanagar Yuva Sansad : 'अहिल्यानगर युवा संसदे'तून विद्यार्थ्यांनी घेतले लोकशाहीचे धडे

0
Ahilyanagar Yuva Sansad : 'अहिल्यानगर युवा संसदे'तून विद्यार्थ्यांनी घेतले लोकशाहीचे धडे
Ahilyanagar Yuva Sansad : 'अहिल्यानगर युवा संसदे'तून विद्यार्थ्यांनी घेतले लोकशाहीचे धडे

Ahilyanagar Yuva Sansad : नगर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) अहिल्यानगर शाखेतर्फे अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमतः ‘अहिल्यानगर युवा संसद’ (Ahilyanagar Yuva Sansad) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. ही युवा संसद २५ व २६ जानेवारी रोजी जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रिया (Democratic process) व विधीमंडळांतील कामकाज जाणून घेतले.

नक्की वाचा: मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट बँडची शहिदांना संगीतमय आदरांजली

विविध मुद्यांवर बिल सादरीकरण व चर्चा

या युवा संसदेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व औद्योगिक विकासावर चर्चा झाली. अहिल्यानगरशहरामधील सीना नदी स्वच्छता प्रकल्पावर बिल सादरीकरण होणार आहे. तसेच राष्ट्रीय विषय जसे की समान नागरी कायदा, वन नेशन वन इलेक्शन, रेग्युलेशन ऑफ कोचिंग इंस्टीट्यूट आदी मुद्यांवर देखील बिल सादरीकरण आहे, यावर विस्तृत चर्चा विद्यार्थ्यांनी सांसद रुपात केली.

अवश्य वाचा: हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

विद्यार्थ्यांनी देशातील घडामोडींवर विचारले प्रश्न (Ahilyanagar Yuva Sansad)

दोन दिवसीय उपक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्र झाले. यात आय लव्ह नगरचे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया, माजी खासदार सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी उपस्थित होते. त्यानंतर लोकसभेचे अधिवेशन असेल ज्यामध्ये समान नागरी कायदा, रेग्युलेशन ऑफ कोचिंग इंस्टीट्यूट आणि झिरो अवर असे तीन सत्र झाली. तसेच तिसरे सत्र हे झिरो अवर होते. ज्यात विरोधी पक्षातील खासदार रुपातील विद्यार्थ्यांनी सत्ताधाऱ्यांना देशातील सध्याच्या घडामोडींवर प्रश्न विचारले. सत्ताधारी रुपातील विद्यार्थ्यांनी बचावात्मक उत्तरे दिली. तिन्ही सत्रांसाठी सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि मंत्रिमंडळ, सभापती हे एकच होते.

Ahilyanagar Yuva Sansad : 'अहिल्यानगर युवा संसदे'तून विद्यार्थ्यांनी घेतले लोकशाहीचे धडे
Ahilyanagar Yuva Sansad : ‘अहिल्यानगर युवा संसदे’तून विद्यार्थ्यांनी घेतले लोकशाहीचे धडे

दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्याचा शाश्वत विकास या विषयावर प्रत्येक सदस्याने तयार करून आणलेल्या ब्लू प्रिंट ची मांडणी झाली. सकाळच्या सत्रात अहिल्यानगर शैक्षणिक विकासावर सामुहिक चर्चा असेल ज्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि सिनेट सदस्य देखील प्रत्यक्षपणे सहभागी झाले. नंतरच्या दोन सत्रात प्रत्येक सदस्यास अहिल्यानगर विकासासंदर्भातील विहित केलेल्या विषयावर (उदा. कृषी, आरोग्य, पर्यावरण, पर्यटन इत्यादी) मुद्दे मांडण्या करिता २-३ मिनिटांचा वेळ दिला गेला. तसेच त्यातील काही निवडक मुद्दे शेवटच्या सत्रात लोकप्रतिनिधी असलेल्या काही आमदारांपुढे मांडण्यात आले. संपूर्ण दिवसात अहिल्यानगरच्या विकासावर चर्चा रंगली.

“अहिल्यानगर युवा संसद” हा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहिल्यानगर महानगरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. शहरातील विविध महाविद्यालयातील प्रतिभावान आणि नेतृत्व करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दोन दिवसीय प्रति संसदीय अधिवेशन अहिल्यानगर मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय अधिवेशनात समान नागरी कायदा, अहिल्यानगरचा शाश्वत विकास अशा महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा रंगली. अभाविपने महाविद्यालयीन तरुणांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणले. आगामी काळात देशामध्ये समान नगरी कायदा आणि रेग्युलेशन ऑफ कोचिंग इंस्टीट्यूट या दोन्ही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, वादविवाद करून आलेले सर्व मुद्दे थेट केंद्र सरकार कडे पाठविण्यात आले.