Ahilyanagar ZP | नगर : इयत्ता दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा होत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जात आहे.या अनुषंगाने जिल्हा परिषद, अहिल्यानगरचे (Ahilyanagar ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद,माध्यमिक शिक्षण विभागाच्या दक्षता समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांचे कॉपीमुक्तीचे मार्गदर्शक व्हिडिओं व संदेशांचे संकलन असलेला “प्रेरणा” हा उपक्रम राबवला जात आहे.
अवश्य वाचा – श्रीगोंदा येथे रस्त्याच्या कामाविरोधात संभाजी ब्रिगेडचे ‘दशक्रिया आंदोलन’
लिखित संदेश संकलन (Ahilyanagar ZP)
या उपक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर जिल्ह्यातील पद्मश्री ,पद्मभूषण सन्मान प्राप्त मान्यवर, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, प्राथमिक/ माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच प्राथमिक /माध्यमिक शाळांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक, विषयशिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक ,तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे यांच्या कॉपीमुक्ती संदेशाचा व्हिडिओ तसेच लिखित संदेश संकलन आहे, अशी माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली.
हे पहा – अजितदादांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेला उमेदवार झाला विजयी
अहिल्यानगर आनंददायी परीक्षा पॅटर्न (Ahilyanagar ZP)
यासाठी माहिती तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेल्या “अहिल्यानगर आनंददायी परीक्षा पॅटर्न” या वेबपेजवर हे व्हिडिओ व संदेश पाहता येतील. त्याचबरोबर शिक्षक, पालक, मुख्याध्यापक व शिक्षणप्रेमी यांचे व्हाट्सअप ग्रुप तसेच सोशल मीडियावर देखील हे व्हिडिओ व संदेश शेअर केले जाणार आहेत. उपक्रमासाठी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच शिक्षक डॉ. अमोल बागुल यांचे सहकार्य मिळत आहे.



