Ahilyanagar ZP | नगर : अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयात केलेल्या दिव्यांग वैद्यकीय पडताळणीत दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या (Ahilyanagar ZP) १५ कर्मचाऱ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात ११ शिक्षक, ३ परिचर, तर एका आरोग्य सेवकाचा समावेश आहे. यातील आठ जणांची नियुक्तीच दिव्यांग प्रमाणपत्रावर असल्याने त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई होणार आहे.
नक्की वाचा : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न
आदेश दिव्यांग मंत्रालयाचे
राज्यातील सर्व शासकीय विभागांतील दिव्यांग कर्मचारी तपासणीचे आदेश दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये दिले होते. अपंगाच्या पडताळणीबाबत राज्य पातळीवरून दिव्यांग विभागाचे सचिव मुंडे यांनी तपासणीचे आदेश काढले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने तालुकानिहाय शिबिरे घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी केली. त्यातून काही कर्मचारी जिल्हा रूग्णालयात, तर काही कर्मचारी नाशिक येथील उपसंचालक कार्यालयाकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
खुलासा मागवला
अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयाने या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष तपासणी केली. त्यात १८ कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे प्रमाण ४० टक्केपेक्षा कमी आढळले. तसा अहवाल जिल्हा रूग्णालयाने जिल्हा परिषदेला पाठवला. जिल्हा परिषदेने या कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागवला. १८ पैकी १५ जणांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिले. यातील एकाचा खुलासा मान्य करण्यात आला. एकाची पुनश्च पडताळणी करण्यात येणार आहे, तर एकाच्या खुलाशाची पडताळणी केली जाणार आहे.
१५ दोषी आढळले
जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या तपासणीत पहिल्या टप्प्यात १८ जणांच्या प्रमाणपत्रावर शंका उपस्थित झाली होती. यातील १५ दोषी आढळले असून एकाचा खुलासा मान्य करण्यात आला असून दोघांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. यासह नाशिक आरोग्य उपसंचालक कार्यालयात तपासणी पाठवलेल्या ४१ प्रमाणपत्रासह नगरच्या जिल्हा रुग्णालयातील तपासणीला गैरहजर असणाऱ्या १८ जणांना पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. यामुळे अद्याप ५९ जणांचा निकाल लागणे बाकी असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हे पहा – वडिलांचं स्वप्न मुलीनं केलं पूर्ण; संगमनेरची लेक झाली कलेक्टर !
यांच्यावर कारवाई
समाधान घुगे (आरोग्य सेवक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र), सुनील वाघ (मुख्याध्यापक, कर्णबधीर), प्रभाकर चोखंडे (परिचर, अस्थिव्यंग), दत्तात्रय फापाळे (मुख्याध्यापक, कर्णबधीर), वामन घाटपांडे (परिचर, अस्थिव्यंग व कायदेशीर कारवाईस पात्र), अतुल सातपुते (परिचर, अस्थिव्यंग), मंदा शिंदे (शिक्षक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र), संगीता कदम (शिक्षक, अस्थिव्यंग), संजयकुमार बडे (शिक्षक, अस्थिव्यंग), वर्षा अकोलकर (शिक्षक, कर्णबधीर व व कायदेशीर कारवाईस पात्र), पुष्पलता खेडकर (शिक्षक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र), सतीश लगड (शिक्षक, अस्थिव्यंग), सागर मोरे (शिक्षक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र), विनयकुमार वाडेकर (शिक्षक, अल्पदृष्टी व कायदेशीर कारवाईस पात्र), संतोष लष्करे (शिक्षक, कर्णबधीर व कायदेशीर कारवाईस पात्र).



