Mahakarandak 2025 : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अहिल्यानगर महाकरंडक २०२५’ (Ahilyanagar Mahakarandak 2025) या एकांकिका स्पर्धेचे आज सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात (Mauli Sabhagruh)उद्घाटन करण्यात आले. ही स्पर्धा १६ ते १९ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन परीक्षक, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे(Director Pravin Tarde), स्नेहल तरडे, निर्माता आणि दिग्दर्शक आशिष वाघ, दिग्दर्शक आणि एडिटर मयूर हरदास, अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धेचे संयोजक स्वप्नील मुनोत, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा आदीची प्रमुख उपस्थिती होती.
नक्की वाचा : मोठी बातमी!अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला
महाकरंडकमध्ये शिवकालीन शस्त्र आणि वस्तू यांचे प्रदर्शन (Mahakarandak 2025)
यावेळी अहिल्यानगर महाकरंडक येथे शिवकालीन पुरातन नाणी, शिवकालीन शस्त्र आणि वस्तू यांचे प्रदर्शन देखील आहे. यानिमित्ताने रंगकर्मींना आणि स्पर्धेला भेट देणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ वस्तू पाहायला मिळत आहेत. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास १ लाख ५१ हजार १११ रुपये रोख, अहिल्यानगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक मिळणार आहे. तसेच विक्रमी रकमेची सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसे देखील असणार आहेत. महाराष्ट्रातील एकांकिकांसाठी इतक्या मोठ्या रकमेची आकर्षक पारितोषिके देणाऱ्या निवडक स्पर्धांमधील प्रमुख स्पर्धा म्हणून ‘अहिल्यानगर महाकरंडक’ स्पर्धेने स्वतःचा नावलौकिक गेल्या दशकभरात कमावला आहे.
अवश्य वाचा : इस्रोचं स्पेडेक्स मिशन यशस्वी;अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरला भारत
‘उत्सव रंगभूमीचा,सोहळा शिवराज्याभिषेकाचा’ (Mahakarandak 2025)
मागील ११ वर्षांपासून ‘अहमदनगर महाकरंडक’ नावाने प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे बदलल्याने आता ‘अहिल्यानगर महाकरंडक’ नावाने ओळखली जाणार आहे. यंदाचं स्पर्धेचं हे १२वे वर्ष आहे. मागील एका तपात ही स्पर्धा राज्यातील सर्वात मोठी मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून नाट्य वर्तुळात ओळख निर्माण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त या एकांकिका स्पर्धेचं यंदाचं ‘उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा’ हे ब्रीदवाक्य आहे.
अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित व आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा सुरू आहे. लेट्सअप हे या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर आहेत. रंगकर्मींच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या ‘अहिल्यानगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धा २०२५ या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेला झी युवा या वाहिनीची साथ मिळाली आहे. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून ‘अहिल्यानगर महाकरंडक’ २०२५ स्पर्धेत आपली भूमिका बजावत आहे.