Ahmednagar Bar Association : अहमदनगर बार असोसिएशनसाठी २३ डिसेंबरला होणार मतदान

Ahmednagar Bar Association : अहमदनगर बार असोसिएशनसाठी २३ डिसेंबरला होणार मतदान

0
Ahmednagar Bar Association : अहमदनगर बार असोसिएशनसाठी २३ डिसेंबरला होणार मतदान
Ahmednagar Bar Association : अहमदनगर बार असोसिएशनसाठी २३ डिसेंबरला होणार मतदान

Ahmednagar Bar Association : नगर : दोनशे वर्षांची वैभवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या नगरच्या जिल्हा न्यायालयातील (Ahilyanagar District and Sessions Court) अहमदनगर बार असोसिएशनच्या (Ahmednagar Bar Association) सन २०२६ वर्षाच्या निवडणुकीची (Election) घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून अर्जांची छाननी, माघार आदी प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’

मंगळवारी सकाळी ८ ते ४ या वेळेत होणार मतदान

अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला सहसचिव, सहसचिव, कार्यकारणी सदस्य व महिला राखीव कार्यकारणी सदस्य या पदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २३) सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अॅड. लक्ष्मण गोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर शहाणे यांनी दिली.

नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

यांच्यात होणार आहे लढत (Ahmednagar Bar Association)

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण गोरे यांनी अंतिम उमेदवारांची यादी घोषित केली आहे. या निवडणुकीत सचिव व खजिनदार या पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने सचिवपदी ॲड. विनोद शेटे व खजिनदारपदी ॲड. वसीम खान यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. अहमदनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ॲड. संदिप बाळासाहेब काळे, ॲड. सुनिल बबनराव भागवत, ॲड. सुरेश आबासाहेब लगड, ॲड. कृष्णा पंडीतराव झावरे यांच्या लढत होत आहे. उपाध्यक्ष पदासाठी ॲड. भाऊसाहेब मुरलीधर घुले व ॲड. स्वाती शामराव पाटील (वाघ) यांच्यात सरळ लढत होणार आहे. महिला सहसचिव पदासाठी ॲड. सारिका मुरलीधर कावरे व ॲड. करुणा रामदास शिंदे या निवडणूक रिंगणात आहेत. सहसचिव पदाकरीता  ॲड. अमोल सुभाष अकोलकर, ॲड. रामेश्वर लक्ष्मण कराळे, ॲड. सारस रावसाहेब क्षेत्रे तसेच कार्यकारिणी सदस्य पदासाठी ॲड. अजिनाथ मच्छिंद्र कर्डिले, ॲड. महेश नारायण कोतकर, ॲड. प्रमोद पोपटराव खामकर, ॲड. ज्ञानदेव दिनकर दाते, ॲड. ज्ञानेश्वर राधाकृष्ण फटांगरे, ॲड. अक्षय  म्हस्के, ॲड. शिवाजी शिंदे, ॲड. आनंद साहेबराव सुर्यवंशी हे निवडणूक लढवत आहेत. महिला राखीव कार्यकारीणी सदस्य पदासाठी ॲड. प्राजक्ता धर्मा करांडे, ॲड. मनिषा पोपटराव भिंगारदिवे व ॲड. राणी गोरख भुतकर आदी मध्ये लढत होणार आहे.