
Ahmednagar Bar Association : नगर : अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील अहमदनगर बार असोसिएशनच्या (Ahmednagar Bar Association) २०२६ वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. कृष्णा झावरे (Adv. Krishna Jhavare) तर उपाध्यक्षपदी ॲड. भाऊसाहेब घुले यांनी निर्णायक विजय मिळवला. मंगळवारी (ता. २३) पार पडलेल्या या निवडणुकीत (Election) मतदानानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. लक्ष्मण गोरे यांनी अंतिम निकाल जाहीर केला. निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात गुलालाची उधळण, पेढ्यांचे वाटप करत वकिलांनी जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.
अवश्य वाचा: चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील
ॲड. कृष्णा झावरे हे ५६३ मते मिळवून विजयी
बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी एकूण १ हजार ८६१ वकिल मतदारांपैकी १ हजार १५७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी सचिवपदी ॲड. विनोद शेटे व खजिनदारपदी ॲड. वसीम खान यांची बिनविरोध निवड झाली होती. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी निवडणुकीत ॲड. कृष्णा झावरे यांनी ५६३ मते मिळवून १८३ मतांनी विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. सुनील भागवत (३८०), ॲड. सुरेश लगड (१३०) व ॲड. संदीप काळे (७४) यांना पराभव स्वीकारावा लागला. उपाध्यक्षपदासाठी ॲड. भाऊसाहेब घुले यांनी ६८६ मते मिळवत ॲड. स्वाती पाटील (४३८) यांच्यावर २४८ मतांनी मात केली. सहसचिव व कार्यकारिणी निवड महिला सहसचिवपदी ॲड. सारिका झरेकर यांनी ६११ मते मिळवून ॲड. करुणा शिंदे (५१६) यांचा पराभव केला. पुरुष सहसचिवपदी ॲड. अमोल अकोलकर ४५३ मते घेऊन विजयी झाले; ॲड. सारस क्षेत्रे (३४०) व ॲड. रामेश्वर कराळे (३२३) यांना पराभव पत्करावा लागला.
नक्की वाचा : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार
महिला राखीव सदस्यपदी ॲड. प्राजक्ता करांडे
पुरुष कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. अजिनाथ कर्डिले (७९२), ॲड. महेश कोतकर (७३४), ॲड. अक्षय म्हस्के (७१५), ॲड. शिवाजी शिंदे (६९२), ॲड. ज्ञानदेव दाते (६६१) व ॲड. प्रमोद खामकर (५६०) हे निवडून आले. महिला राखीव कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. प्राजक्ता करांडे यांनी ६२४ मते मिळवून विजय संपादन केला.
नूतन कार्यकारिणी जाहीर (Ahmednagar Bar Association)
निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. लक्ष्मण गोरे व सहाय्यक निर्णय अधिकारी ॲड. प्रभाकर शहाणे यांनी जाहीर केलेली अंतिम कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : ॲड. कृष्णा झावरे, उपाध्यक्ष : ॲड. भाऊसाहेब घुले, सचिव : ॲड. विनोद शेटे,
खजिनदार : ॲड. वसीम खान, सहसचिव : ॲड. अमोल अकोलकर, महिला सहसचिव : ॲड. सारिका झरेकर, कार्यकारिणी सदस्य –ॲड. महेश कोतकर, ॲड. अक्षय म्हस्के, ॲड. अजिनाथ कर्डिले, ॲड. शिवाजी शिंदे, ॲड. ज्ञानदेव दाते, ॲड. प्रमोद खामकर व ॲड. प्राजक्ता करांडे.
युवा नेतृत्वाकडे धुरा (Ahmednagar Bar Association)
नव्या कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकारी युवा असल्याने बार असोसिएशनची धुरा युवकांच्या हाती गेली असल्याचे चित्र आहे. यामुळे संघटनेच्या कार्यपद्धतीत नवचैतन्य येण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. नूतन अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे म्हणाले, “वकील बंधू-भगिनींनी मोठ्या बहुमताने माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला पात्र ठरत वर्षभर विविध उपक्रम राबवून वकिलांचे प्रश्न, प्रलंबित समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊ. सर्व सहकारी पदाधिकारी आणि वकीलवर्गाला सोबत घेऊन संघटनेच्या हितासाठीच काम करणार आहे.”


