Ahmednagar District Football Association : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंचे यश

Ahmednagar District Football Association : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंचे यश

0
Ahmednagar District Football Association : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंचे यश
Ahmednagar District Football Association : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंचे यश

Ahmednagar District Football Association : नगर : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे (Ahmednagar District Football Association) दोन उभरते फुटबॉलपटू ओम दंडवते आणि प्रदीप सिंग यांची महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाच्या संतोष ट्रॉफी २०२५-२६ (Santosh Trophy 2025–26) पूर्वतयारी कोचिंग कॅम्प व सिलेक्शन ट्रायल्ससाठी निवड झाली आहे. तसेच शहरातील आणखी एक होनहार खेळाडू हर्षद सोनवणे याची ‘प्रोजेक्ट महादेवा’ (Project Mahadeva) अंतर्गत होणाऱ्या अंडर-१३ अंतिम निवड चाचणीसाठी निवड झाली असल्याची माहिती जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रोनप फर्नांडिस (Ronap Fernandes) यांनी दिली.

अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?

प्री-कॅम्पसाठी पात्रता

हिंगोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत ओम दंडवते आणि प्रदीप सिंग यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्य पातळीवरील प्रशिक्षक आणि निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या खेळामुळेच त्यांना या प्रतिष्ठेच्या प्री-कॅम्पसाठी पात्रता मिळाली आहे. जयपूर, राजस्थान येथे पार पडणाऱ्या संतोष ट्रॉफीच्या गट-अ फेरीसाठी महाराष्ट्र संघाची तयारी केली जाणार आहे.

नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे

प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत अंतिम निवड चाचणी होणार (Ahmednagar District Football Association)

राज्यातील फुटबॉल प्रतिभा-विकासातील सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत अंडर-१३ मुलांची अंतिम निवड चाचणी होणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश राज्यभरातील सर्वोत्तम १३ वर्षांखालील मुलामुलींची निवड करून त्यांना ५ वर्षांची शैक्षणिक व प्रगत फुटबॉल प्रशिक्षण शिष्यवृत्ती देणे हा आहे. राज्यातून केवळ ६० मुलांना या अंतिम टप्प्यासाठी बोलावण्यात आले असून त्यातून ३० जणांची अंतिम निवड होणार आहे.

यात अहमदनगरचा हर्षद सोनवणे आपले कौशल्य सिद्ध करण्यास सज्ज झाला आहे. निवड झालेल्या तिन्ही खेळाडूंना जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोग सिंह मिन्हास, अमरजीतसिंग साही, खजिनदार रिश्‍मलसिंग परमार, तसेच संयुक्त सचिव प्रदीपकुमार जाधव आणि व्हिक्टर जोसेफ यांनी अभिनंदन केले आहे.