
२६ कोटी ७८ लाखांचा ढोबळ नफा, १६२२ कोटी ३२ लाखांच्या ठेवी
Ahmednagar Merchants’ Co-op. Bank : नगर: अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँक लि.(Ahmednagar Merchants’ Co-op. Bank), अहमदनगरच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत (Board of Directors’ Meeting) दि. ३१ मार्च २०२६ अखेरच्या वर्षासाठीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले आहे . परंपरेनुसार बँकेने स्थिर वाढ, पारदर्शक कारभार (Transparent Operations), मजबूत आर्थिक शिस्त आणि भक्कम आर्थिक पाया दर्शविला आहे.
मागील आर्थिक वर्षात बँकेने ग्राहकहिताला प्राधान्य देत कर्जावरील व्याजदरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला, ज्यामुळे ग्राहक समाधानात लक्षणीय वाढ झाली आहे. बॅंकेला आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक तथा विद्यमान चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी दिली.
अवश्य वाचा: मोबाईल व घरातील दागिने घेऊन नवरी पसार; पाथर्डी तालुक्यातील घटना
या प्रसंगी चेअरमन हस्तीमलजी मुनोत, व्हाईस चेअरमन अमित मुथा, संचालक आनंदराम मुनोत, संजय बोरा, किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, संजय चोपडा, किशोर मुनोत, संजीव गांधी, सुभाष बायड, प्रमिलाताई बोरा, मिनाताई मुनोत, विजय कोथिंबीरे, सुभाष भांड, सीईओ सुनील पुराणिक, जॉइंट सीईओ नितीन भंडारी, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी, जितेंद्र बोरा आदी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर लाभ देऊनही बँकेने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून २५ कोटी ३९ लाखांच्या व्याज सवलतीनंतर २६ कोटी ७८ लाखांचा ढोबळ नफा मिळविला आहे. हे बँकेच्या संतुलित आणि ग्राहकाभिमुख धोरणाचे द्योतक आहे. आयकर व रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार आवश्यक सर्व तरतुदी केल्यानंतर बँकेने ७ कोटी ४४ लाख रुपये इतका निव्वळ नफा मिळविला आहे.
या वर्षात बँकेने व्यवसायात भरीव वाढ नोंदवली असून बँकेच्या एकूण ठेवी १६२२ कोटी ३२ लाखांवर पोहोचल्या आहेत. गत वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये १६० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण कर्जवाटप १०४९ कोटी १२ लाख असून कर्ज वितरणात ८१ कोटींनी वाढ झाली आहे. कासा ठेवीत ६६ कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे.
बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून नेट एनपीए जवळपास ०.६३ टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे, तसेच एनपीए खात्यांसाठी भरीव आणि सुदृढ तरतुदी करण्यात आल्या आहेत. बँक आज अत्यंत मजबूत आर्थिक पायावर उभी असून २७१ कोटी ८१ लाखांच्या भक्कम राखीव निधीमुळे (सद्य स्थितीत सुमारे २८७ कोटी ६५ लाख) ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

बँकेचे चेअरमन हस्तीमलजी मुनोत म्हणाले की,
“ग्राहकहित जपत बँकेने मजबूत नफा, भक्कम राखीव निधी आणि जवळपास शून्य एनपीए साध्य केले आहे. तंत्रज्ञान उन्नतीसह सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील. यामुळे ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला असून बँक अत्यंत मजबूत स्थितीत आहे. बॅंकेच्या यशस्वी वाटचालीत सर्व सहकारी संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी ग्राहकांना सदैव तत्पर सेवा देण्यात अग्रेसर असतात.
तसेच, यावेळी संचालक सीए, आयपी अजय मुथा म्हणाले की,(Ahmednagar Merchants’ Co-op. Bank)
बँक तंत्रज्ञान उन्नतीवर विशेष भर देत असून, यावर्षी संचालक मंडळाचे मानस आहे की, नवीन कोअर बँकिंग सॉफ्टवेअर, युपीआय डायरेक्ट मेंबरशिप, कॉन्टॅक्टलेस कार्ड सेवा, कार्डलेस कॅश विथड्रॉल, ई मॅनडेट यासारख्या आधुनिक डिजिटल सुविधा लवकरच सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत.
बँकेच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ठेवीदार, ग्राहक व सभासदांचा विश्वास अधिक बळकट झाला असून पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि ग्राहकहिताचे धोरण यामुळे बँक प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे.
व्हाईस चेअरमन अमित मुथा म्हणाले की, काळानुरूप बदल करत मर्चंटस बॅंकेने कॉर्पोरेट बँकिंग सेवा देण्यास सुरुवात केली आहे. मुख्य शाखेचा विस्तार करीत दाळमंडई येथे प्रशस्त ‘हेडऑफिस ॲनेक्स’ कार्यालय उभारण्यात येत आहे. बँक भविष्यातही शाश्वत वाढ, आधुनिक सेवा, उत्कृष्ट ग्राहक अनुभव आणि आर्थिक समावेश यासाठी कटिबद्ध असून आगामी काळात अधिक मोठी यशस्वी वाटचाल करणार आहे.


