AHMEDNAGAR ZILLA PRATHMIK SHIKSHAK SAHAKARI BANK : शिक्षक बँकेची डिजिटल बँकिंग सेवा वर्षअखेरपर्यंत सुरू होणार : तापकीर

AHMEDNAGAR ZILLA PRATHMIK SHIKSHAK SAHAKARI BANK : शिक्षक बँकेची डिजिटल बँकिंग सेवा वर्षअखेरपर्यंत सुरू होणार : तापकीर

0

AHMEDNAGAR ZILLA PRATHMIK SHIKSHAK SAHAKARI BANK : नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला (AHMEDNAGAR ZILLA PRATHMIK SHIKSHAK SAHAKARI BANK) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ६ कोटी ६८ लाख ०९ हजार १९ इतका निव्वळ नफा झाला आहे. त्यातून आवश्यक त्या तरतुदी वजा जाता सभासदांना पाच टक्के प्रमाणे लाभांश वार्षिक सभेनंतर देण्यात येणार आहेत. तसेच वर्षाअखेर बँकेतर्फे ऑनलाईन बँकिंग (Online Banking) सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर (Balasaheb Tapkir) व उपाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी दिली. शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नक्की वाचा :  आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…   

तापकीर म्हणाले,

गेल्या वर्षभरापासून बंद असलेली एटीएम सेवा पूर्ववत रित्या सुरू करीत आहोत असेही ते म्हणाले. अहवाल सालात बँकेच्या कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ न करता शैक्षणिक कर्जाचा व्याजदर ०.४० ने कमी करून ७.५० इतका केला आहे. घरकर्ज व वाहन तारण कर्ज याचा व्याजदर पूर्वी प्रमाणेच ७.९० असून इतर कर्जाचा व्याजदर ८.४० असा आहे. एवढ्या कमी व्याजदारामध्ये कर्ज वितरण करणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही राज्यातील एकमेव बँक आहे.

अवश्य वाचा :  “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य 

यावेळी शिक्षक नेते उपस्थित (AHMEDNAGAR ZILLA PRATHMIK SHIKSHAK SAHAKARI BANK)

यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, दत्ता कुलट, अर्जुनराव शिरसाठ, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, राजेंद्र शिंदे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, शरद सुद्रिक, राजेंद्र कुदनर गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे, संघाचे जिल्हाध्यक्ष बबन दादा गाडेकर, राजेंद्र ठोकळ, नारायण पिसे, प्रकाश नांगरे व विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, संतोष आंबेकर, प्रदीप दळवी, जितू रहाटे, बाळासाहेब कापसे, राजेंद्र निमसे, प्रदीप चक्रनारायण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here