AI : श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेची (Rayat Shikshan Sanstha) कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालय (Shri Kolaidevi Vidyalaya) केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता एक उत्कृष्ट ‘संस्कार केंद्र’ बनली आहे. “प्राचार्य शहाजी हिरडे यांच्या समर्पित सेवेमुळे कोळाईदेवी विद्यालयाने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात नवी उंची गाठली आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वाखालील कार्यकाळात विद्यालयाने मिळवलेले विविध पुरस्कार हे त्यांच्या कष्टाचे फलित आहेत,” असे गौरवद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी काढले.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
प्राचार्य हिरडे यांची सेवापूर्ती
कोळगाव येथील कोळाईदेवी विद्यालयाचे प्राचार्य शहाजी हिरडे हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य ‘सेवापूर्ती सोहळा’ आणि नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्राचार्य शहाजी हिरडे यांचा त्यांच्या पत्नीसह शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्राचार्य बी. एन. पवार यांच्या हस्ते ‘AI’ कक्षाचे उद्घाटन (AI)
कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई वहिनी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव (माध्यमिक विभाग) प्राचार्य बी. एन. पवार यांच्या हस्ते सुसज्ज ‘AI’ कक्षाचे व नूतनीकरण केलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य पवार म्हणाले, (AI)
“आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) अत्यंत महत्त्वाची आहे. या कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकायला मिळेल, ज्यामुळे ते भविष्यातील स्पर्धात्मक जगात अधिक सक्षम होतील. रयत शिक्षण संस्थेचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.”
शिक्षक प्रतिनिधी संजय ठोकळ आणि विद्यार्थिनी उत्कर्षा राऊत यांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य हिरडे यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी नृत्य व गीतांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या सरांना निरोप दिला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना प्राचार्य हिरडे यांनी ३३ वर्षांच्या प्रवासात शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. शैक्षणिक गुणवत्ता आणि शिस्त टिकवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिलो. कुटुंबाची आणि नातेवाईकांची खंबीर साथ नसती, तर हा प्रवास इतका यशस्वी झाला नसता असे सांगितले.
या सोहळ्यास माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, प्राचार्य नवनाथ बोडखे, सहसचिव प्राचार्य बी. एन. पवार, कुंडलिकराव दरेकर, अमित लगड, हेमंत नलगे, पुरुषोत्तम लगड, नितीन डुबल, नितीन नलगे, प्रतापराव नलगे, मधुकर लगड, शहाजी मखरे, राजेंद्र खेडकर, विलास लबडे, वसंतराव नरवडे, दिलीप तुपे, शंकरराव लगड, ताराबाई लगड, पर्यवेक्षक दत्तात्रय मोरे, प्रशांत खामकर, शिक्षक वृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री धीवर, अशोक बडवे व प्रशांत खामकर यांनी केले.



