AI Video: एआयने बनवलेले व्हिडिओ नेमके कसे ओळखायचे? जाणून घ्या…  

0
AI Video: एआयने बनवलेले व्हिडिओ नेमके कसे ओळखायचे? जाणून घ्या...  
AI Video: एआयने बनवलेले व्हिडिओ नेमके कसे ओळखायचे? जाणून घ्या...  

AI Video : गेल्या काही दिवसांत तुमच्या इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर काही विचित्र व्हिडिओ पहिले असतील. मग त्यामध्ये पुण्यात घरात शिरलेले बिबटे असतील किंवा रस्त्यावर बसलेला वाघ ज्याला एखादा माणूस दारू पाजतोय. हे सगळे पाहून तुम्ही थक्क झाला असाल. काहींना भीती वाटली असेल किंवा काहींनी गंमत म्हणून लगेच हे व्हिडिओ फॉरवर्ड केले असतील, मात्र थांबा,असं करू नका हे सगळे व्हिडिओ खोटे आहेत. कारण ते AI ने तयार केलेले व्हिडिओ (AI Video) आहेत. आता तुम्ही म्हणाल हे एआय व्हिडिओ ओळखायचे कसे (How to identify AI videos) जाणून घ्या…

नक्की वाचा: मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती   

AI व्हिडिओ नेमके कसे ओळखाल ? (AI Video

१. क्वालिटी

आजकाल सोशल मीडियावर AI तयार केलेले व्हिडिओ एवढे परफेक्ट दिसतात की सामान्य माणूस हा पटकन फसतो. तर सगळ्यात आधी येते ती व्हिडिओची क्वालिटी. व्हिडिओची क्वालिटी ही  फारच वाईट असेल किंवा ब्लर व्हिडिओ असेल तर लगेच तुम्हाला लक्षात यायला हवं की, हा व्हिडिओ एआयने जनरेट केलेला आहे. बेसिक गोष्ट आहे. कारण आजकाल साध्यातल्या साध्या मोबाईल मध्ये सुद्धा ४K मध्ये व्हिडिओ शूट करता येतो. मग वेळ रात्रीचे असली तरी व्हिडिओ चांगले शूट होतात. मग हा व्हिडिओ एवढा ब्लर का? असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा.पटकन समजून घ्या की, हा व्हिडिओ एआयने बनवलेला आहे.

२. बनावट CCTV फूटेज

दुसरा प्रकरण आहे. बनवत सीसीटीव्ही फुटेज. आता तुम्ही पहा इन्स्टा किंवा फेसबुक वर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं भासवलं जात. मात्र हे सगळं लोकांची फसवणूक करण्यासाठी एआयच्या माध्यमातून केले जात. अनेकदा या सीसीटीव्ही  व्हिडिओमध्ये  तारीख-वेळेच्या जागी फक्त आकडे लिहिलेले असतात. तसेच या व्हिडिओचा आवाजही नीट नसतो.

३. अतिशय चकचकीत आणि परफेक्ट दिसणं

व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्तीची त्वचा जर फार तुकतुकीत किंवा चकचकीत दिसत असेल, डोळे-नाक आखीव,रेखीव असणे, केस किंवा कपडे वेगळ्याच प्रकारे हलत असतील तर हे व्हिडिओ  AI असण्याची शक्यता जास्त आहे. व्हिडिओतील लोकांचे चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यांच्या हालचाली पहा, त्या बऱ्याचदा अनैसर्गिक वाटतात. कारण एआयला हे  बारकावे अजूनही नीट जमत नाहीत. AI ला अजूनही व्यक्तीच्या हात-बोटं करणे ही नीट जमत नव्हतं. एखादा उडी मारतोय, धावतोय तर त्याची सावली, शरीराची रचना यात गडबड दिसते. काही अँप मध्ये हा घोळ अजूनही पाहायला मिळतो.

४. गायब होणारे किंवा बदलणारे डिटेल्स

काही दिवसांपूर्वी ट्रॅम्पोलिनवर उड्या मारणाऱ्या सशांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सुरवातीला ६ ससे उद्या मारताना दिसतात. मात्र अचानक एक ससा अचानक गायब होतो, तर दुसऱ्याचा आकार बदलतो, तसेच हा व्हिडिओ देखील सीसीटीव्ही फुटेज असल्याचे भासवण्यात आलं होत. मात्र हा व्हिडिओ देखील खरा नव्हता. 

अवश्य वाचा: ‘महावतार नरसिंह’ सिनेमाची ऑस्करसाठी एन्ट्री;’या’आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी होणार टक्कर  

५. फक्त ६-१० सेकंदांचे व्हिडिओ

जास्त लांब व्हिडिओ तयार करायला पैसे लागतात. म्हणजे सब्स्क्रिप्शन लागत म्हणून फ्री मध्ये बनवलेले बहुतेक व्हायरल AI क्लिप फक्त काही सेकंदांच्या असतात.

६. Sora चा वॉटरमार्क

OpenAI च्या Sora ने बनवलेल्या व्हिडिओवर “Sora” असा वॉटरमार्क येतो. तो काहीतर पॅच लावून झाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा त्या जागी ब्लर केलेल असत.

७. सर्वात महत्त्वाच म्हणजे खरंच असं होऊ शकतं का?

रस्त्यावर बसलेला वाघ आणि त्याला दारू पाजणारा माणूस. खरच हे शक्य आहे का? हा प्रश्न विचारला की ९०% बनावट व्हिडिओ लगेच ओळखता येतात.