AIFF Youth League : स्टेट यूथ लीग स्पर्धेसाठी फिरोदिया शिवाजीयन्सचा संघ रवाना

AIFF Youth League : स्टेट यूथ लीग स्पर्धेसाठी फिरोदिया शिवाजीयन्सचा संघ रवाना

0
AIFF Youth League : स्टेट यूथ लीग स्पर्धेसाठी फिरोदिया शिवाजीयन्सचा संघ रवाना
AIFF Youth League : स्टेट यूथ लीग स्पर्धेसाठी फिरोदिया शिवाजीयन्सचा संघ रवाना

AIFF Youth League : नगर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF Youth League) यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र स्टेट यूथ लीग स्पर्धेसाठी अहिल्यानगर शहरातील १५ वर्षाखालील मुलांचा फिरोदिया शिवाजीयन्स संघ (Firodia Shivajiyans Football Academy) लोणावळा येथे रवाना झाला आहे. ही स्पर्धा सिंहगड कॉलेजच्या मैदानावर खेळवली जात आहे.

अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक

प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान

फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीला सलग दुसऱ्यांदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेचे सामने तीन टप्प्यांत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मध्ये खेळवले जातील. या लीगमधील अव्वल दोन संघांना एआयएफएफ आयोजित ‘ऑल इंडिया यूथ लीग’ मध्ये पात्रता मिळते.

नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार

या १९ खेळाडूंचा समावेश (AIFF Youth League)

संघात अशोक चंद (कर्णधार), चिराग गोरे, हर्षद सोनवणे, सौरभ खंडेलवाल, मोक्ष गरदास, आदर्श साबळे, कृष्णा भिसे, आदित्य गर्जे, आर्यन सोनवणे, ग्लेन फर्नांडिस, अथर्व गिर्जे, अंशुमन  विधाते, जोएल साठे, ओम लोखंडे, रामचंद्र पालवे, सोहम सौंदुळकर, अभिनव राऊत, हंजला खान, समर्थ बिरुंगी या १९ खेळाडूंचा समावेश आहे.


संघाचे प्रशिक्षक जेव्हिअर स्वामी व सचिन पठारे, संघ व्यवस्थापक महिमा पठारे, तर फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ वेदिका दिवे जबाबदारी सांभाळत आहेत. या संघाच्या वाटचालीमागे अकॅडमीचे आधारस्तंभ नरेंद्र फिरोदिया आणि मनोज वाळवेकर यांचे मार्गदर्शन व दृष्टीकोन महत्त्वाचा असून, जिल्ह्यातील युवा फुटबॉलला नवी दिशा देण्याचे ते कायमच प्रयत्न करत आहे.


या संपूर्ण मोहिमेसाठी आय लव्ह नगर आणि ग्रोथ एक्स (बेंगळुरू) या दोन्ही स्पॉन्सर्सचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या उदार समर्थनामुळे फिरोदिया शिवाजीयन्सला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मंचांवर पोहोचण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे. फिरोदिया शिवाजीयन्सच्या प्रगतीसाठी कोअर कमिटी  सदस्य पल्लवी सैदाने, सचिन पठारे, अभिषेक सोनावणे, श्रेया सागडे, जेव्हिअर स्वामी आणि राजेश अँथनी योगदान देत आहेत. दरम्यान जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रोनप फर्नांडिस, उपाध्यक्ष खालिद सय्यद, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहसचिव प्रदीप जाधव, विक्टर जोसेफ आणि राजू पाटोळे यांनी शुभेच्छा दिल्या.