AIMIM : परवानगीशिवाय विजयी मिरवणूक; एमआयएमच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

AIMIM : परवानगीशिवाय विजयी मिरवणूक; एमआयएमच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

0
AIMIM : परवानगीशिवाय विजयी मिरवणूक; एमआयएमच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल
AIMIM : परवानगीशिवाय विजयी मिरवणूक; एमआयएमच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

AIMIM : नगर : महापालिका निवडणुकीचा (Municipal Elections) निकाल जाहीर झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करून मिरवणूक काढणे नवनिर्वाचित नगरसेवकांना (Newly Elected Corporator) महागात पडले आहे. मुकुंदनगर (Mukundnagar) भागात विनापरवाना विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी एमआयएमचे (AIMIM) नवनिर्वाचित नगरसेवक खालीद दिलदार शेख आणि हाजी शेहबाज सय्यद यांच्यासह कार्यकर्त्यांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल

प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही मिरवणूक

जिल्हाधिकाऱ्यांनी १४ ते २७ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. असे असतानाही २१ जानेवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास मुकुंदनगरमधील नाज चौक येथे कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता १२० ते १२५ कार्यकर्त्यांच्या जमावासह ही मिरवणूक काढण्यात आली.

अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…

दोन्ही नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल (AIMIM)

त्यामुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हवालदार अजय सदाशिव गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार इनामदार करत आहेत.