Maha Kumbh 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभ मेळाव्याचे (Mahakumbh 2025) आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील भाविक पवित्र स्नानासाठी येथे येत आहेत. मात्र,भाविकांचा हा प्रवास फार खर्चिक झाला. हवाई मार्गे प्रयागराजला पोहोचण्यासाठी विमान कंपन्यांनी फ्लाईट्सचे दर अव्वा सव्वा दराने वाढवले आहे. यावरून टीका झाल्यानंतर आता सरकारने हे दर कमी (Low flight rates) करण्याकरता पावले उचलली आहेत.
नक्की वाचा : ‘पालकमंत्रीपदासाठी हट्ट करणे म्हणजे मंत्र्यांचा हावरटपणा’ -एकनाथ खडसे
प्रयागराजच्या फ्लाइटचे दर होणार कमी (Maha Kumbh 2025)
नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी (ता.२७) सांगितले की, प्रयागराजच्या फ्लाइटसाठी विमान भाडे कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.महाकुंभच्या पार्श्वभूमीवर वाढती रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी फ्लाइट्सची संख्या वाढवण्यात आली आहे. १३ जानेवारीपासून महाकुंभला सुरुवात झाली असून २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ असणार आहेत. रेल्वेने आतापर्यंत या ठिकाणी ४८ लाख भाविकांची नोंद केली. तर उर्वरित भाविक रस्तेमार्गे किंवा हवाईमार्गे प्रयागराज येथे पोहोचत आहेत. परंतु, हवाई मार्ग इतर मार्गांपेक्षा अधिक खर्चिक असून उड्डाणांच्या वाढत्या विमानभाड्यांबाबत विमान वाहतूक नियामक डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात विमान कंपनींच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली. या बैठकीत तिकिट दर आणि उड्डाणांची संख्या वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : सुंदर डोळ्यांच्या व्हायरल मोनालिसाला बॉलिवूडमधून ऑफर
विमान फेऱ्या वाढवण्याचे आवाहन (Maha Kumbh 2025)
नागरी उड्डान मंत्री के.राम मोहन नायडू यांच्या निर्देशानुसार,सणवार जवळ येत असताना विशेषत:आगामी शाही स्नान दरम्यान २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, ४ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इतर महत्त्वाच्या स्नानादरम्यान विमान भाडे नियंत्रणात राहील, याची खात्री करण्यासाठी आणि विमानाच्या फेऱ्या वाढवण्याच्या सल्ला दिला आहे. सध्याच्या नियमांनुसार, विमान भाडे नियंत्रणमुक्त आहे. अकासा एअर २८ आणि २९ जानेवारीला अहमदाबादहून प्रयागराजसाठी उड्डाणे सुरू करेल. फेब्रुवारीमध्ये, एअरलाइनने अहमदाबादहून ९ उड्डाणे आणि बेंगळुरू ते प्रयागराजपर्यंत १२ उड्डाणे चालवण्याची योजना आहे. स्पाइसजेट दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी, बेंगळुरू,अहमदाबाद, मुंबई, जयपूर आणि हैदराबाद येथून प्रयागराजसाठी उड्डाणे सुरू करणार आहे. यामध्ये फेब्रुवारीमध्ये सुमारे ४३ हजार जागांची भर पडेल,असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.