AITUC : नगर : ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक)(AITUC) च्या वतीने शाहू महाराजांचे (Shahu Maharaj) जन्मगाव कोल्हापूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची दीक्षाभूमी नागपूर दरम्यान निघालेली राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा उद्या (ता. ३०) नगर शहरात दाखल होणार आहे. जनविरोधी भाजप (BJP) सरकार हटाव देश बचाव राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रेच्या शहरात स्वागतासाठी समविचारी पक्ष व संघटनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यात्रेचे निमंत्रक ॲड. सुधीर टोकेकर यांनी केले आहे.
हे देखील वाचा: ..ती राजकीय चूक झाली, नाहीतर राज्यात भाजपची सत्ता आली नसती; माजी मुख्यमंत्र्यांची कबुली
२० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान आयटकतर्फे राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा ३० नोव्हेंबरला नगर शहरात दाखल होणार असून सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅली काढण्यात येणार आहे. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, माळीवाडा येथील महात्मा फुले यांचा पुतळा, वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीचे मार्गक्रमण होणार आहे. तर या रॅलीचा समारोप स्वस्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार होऊन, त्या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नक्की वाचा: वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित