Ajay Baraskar : अजय बारस्करांचं अख्ख गावच जरांगेंच्या पाठिशी 

Ajay Baraskar : अजय बारस्करांचं अख्ख गावच जरांगेंच्या पाठिशी 

0
Ajay Baraskar

Ajay Baraskar : नगर : ”माझ्यावर मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या आराेपाचे माझ्या सावेडी गावातील ग्रामस्थांनी खंडन केले आहे,” असे अजय महाराज बारस्करांनी (Ajay Baraskar) आज पत्रकार परिषद (Press conference) घेऊन सांगितले. परंतु, मनाेज जरांगे यांच्यावर टीका केल्याने संपूर्ण गावाने बारस्करांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.  मनाेज जरांगे पाटील यांच्या पाठिशी सावेडी गावातील मराठा बांधव भक्कमपणे उभे असल्याचा एकमताने ठराव करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा: मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित; पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार

अजय बारस्कर यांचा सावेडी गावाच्या वतीने निषेध (Ajay Baraskar)

नगर शहरातील सावेडी गावठाण परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांचा सर्वानुमते सावेडी गावाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच त्याच्या वक्तव्याला सावेडी ग्रामस्थांचे अजिबात समर्थन नाही, असा एकमताने निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारा अजय बारस्कर हा सावेडी गाव परिसरात राहत आहे. जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपाचे सत्र सुरू केले आहे. तेव्हापासून नगर शहरासह बारस्कर राहत असलेल्या परिसरातील नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला.

नक्की वाचा: मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

मनोज जरांगे यांच्या पाठीशी (Ajay Baraskar)

संपूर्ण सावेडी गावातील मराठा बांधव हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांनी उभारलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या लढाईला सदैव साथ देणार असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी ठराव केला. गावातील ग्रामस्थांचा कोणत्याही प्रकारे अजय बारस्कर याच्या वक्तव्यांना पाठिंबा नसून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे पत्र अहमदनगर येथील मराठा क्रांती मोर्चा यांना दिले आहे. यावेळी माजी महापाैर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक कुमार वाकळे, रवींद्र बारस्कर, बबन बारस्कर, राजेंद्र वाकळे, यशदेव बारस्कर, सरेश करपे, राजेंद्र काळे, रवींद्र वाकळे, सचिन बारस्कर, नितीन बारस्कर आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here