Ajay Maharaj Baraskar :’मनोज जरांगे हे रोज खोटं बोलतात,रोज पलटी मारतात’- अजय महाराज बारस्कर 

अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर तुफान हल्लाबोल केला. मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला.

0
Ajay Maharaj Baraskar
Ajay Maharaj Baraskar

नगर : मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात,रोज खोटं बोलतात असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला. अजय बारस्कर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, जरांगे पाटलांवर ही टीका केली.

नक्की वाचा : शंभू सीमेवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये झटापट;अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

अजय महाराज बारस्कर काय म्हणाले ? (Ajay Maharaj Baraskar)

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा.आमचा समाज खूप भोळा आहे. मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो. यापूर्वी त्यांनी मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहे ते सांगत होते.

मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही. मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही.आताच हे का झालं तर काही दिवसापासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली. मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून नाही प्यायलो. मला तिथे म्हणाला, संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला,असं बारस्कर म्हणालेत.

जरांगेंच्या अनेकांशी गुप्त बैठका  (Ajay Maharaj Baraskar)

२३ डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजनगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता, असं ते पुढे म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here