Ajit Agarkar on Shubman Gill: शुभमन गिलला संधी न देण्याचं कारण काय? अजित आगरकरांनी एका वाक्यात विषय संपवला 

0
Ajit Agarkar on Shubman Gill: शुभमन गिलला संधी न देण्याचं कारण काय? अजित आगरकरांनी एका वाक्यात विषय संपवला 
Ajit Agarkar on Shubman Gill: शुभमन गिलला संधी न देण्याचं कारण काय? अजित आगरकरांनी एका वाक्यात विषय संपवला 

नगर: टी-२० वर्ल्डकपसाठी (T-20 World Cup) भारतीय संघाची (Team India squad) आज (ता.२०) घोषणा करण्यात आली. मुंबईत बीसीसीआयच्या (BCCI) मुख्यालयात, सचिव देवजीत सैकिया यांनी मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियामध्ये ईशान किशनची वापसी झाली असली, तरी या संघात शुभमन गिलला (Shubman Gill) दणका देण्यात आला आहे. त्याला थेट संघातून वगळण्यात आलं आहे. अक्षर पटेलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, रिंकू सिंहची सुद्धा वापसी झाली असून संजू सॅमसनचे स्थान संघात कायम आहे.

नक्की वाचा: राज्यात थंडीचा कडाका वाढला;अहिल्यानगरमध्ये पारा ६ अंशावर

शुभमन गिलला वगळण्याचे कारण काय ? (Ajit Agarkar on Shubman Gill)

शुभमन गिलला संघातून का वगळले याच कारण सांगताना अजित आगरकर म्हणाले की, शुभमन गिल सध्या धावा काढण्यास संघर्ष करत आहे आणि गेल्या वर्ल्ड कपमध्येही तो खेळला नव्हता. आता गिलच्या वगळण्यावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “आम्हाला टॉपला एक कीपर हवा होता. वर्ल्डकप पूर्वी ११ जानेवारीपासून संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका देखील खेळेल. टी-२० विश्वचषकाची सुरवात ७ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्याने होईल. त्याच दिवशी, भारताचा पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर यूएई विरुद्ध असेल. अंतिम सामना ८ मार्च २०२६ रोजी खेळवला जाईल.

अवश्य वाचा: दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

भारतीय संघ निवडीतील महत्वाचे मुद्दे (Ajit Agarkar on Shubman Gill)

शुभमन गिलचा संघात समावेश केला नाही, जो एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. तो सध्या फॉर्ममध्ये नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अक्षर पटेलला नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.  
संजू सॅमसन आणि इशान किशन दोघांनाही विकेटकीपिंगसाठी संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
रिंकू सिंह संघात परतला आहे आणि तो मधल्या फळीत आणि फिनिशर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.