Ajit Pawar : अजित पवारांनी ‘त्यांना’ तंबी कसली दिली, शांत बसण्याची की पोस्टर फाडण्याची ?

Ajit Pawar : अजित पवारांनी 'त्यांना' तंबी कसली दिली, शांत बसण्याची की पोस्टर फाडण्याची ?

0
Ajit Pawar : अजित पवारांनी 'त्यांना' तंबी कसली दिली, शांत बसण्याची की पोस्टर फाडण्याची ?
Ajit Pawar : अजित पवारांनी 'त्यांना' तंबी कसली दिली, शांत बसण्याची की पोस्टर फाडण्याची ?

Ajit Pawar : शेवगाव : टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, म्हातारा झाला असला तरी खूप गडबड चालू आहे. असं पुन्हा एकदा नाव न घेता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीकास्त्र सोडत मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी भुजबळ हे वारंवार आरोप करत आहेत, आता त्यांना तंबी देणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) सांगणं आहे की, ते शांत बसले नाही तर मीही शांत बसणार नाही.

हे देखील वाचा : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे


तुम्ही त्यांना तंबी दिली म्हणतात, म्हणून मी काल शांत बसलो. पण ते पुन्हा आम्हांला उचकावल जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत संविधानिक पदावर सोबत बरोबरीने बसलेली ती व्यक्ती आहे. आम्हाला उचकाऊन देऊ नका. आम्हाला राज्य शांततेत ठेवायचे आहे, अशी तंबीच मनोज पाटील यांनी आज शेवगाव येथे पार पडलेल्या सभेदरम्यान छगन भुजबळ यांचं नाव न घेता दिली. मला असे समजले की अजित पवार यांनी त्यांना (छगन भुजबळ) तंबी दिली आहे. तरीही आज मराठा समाजाची पोस्टर फाडली गेली. मग अजित पवारांनी त्यांना कसली तंबी दिलीय, शांत बसण्यासाठी की पोस्टर फाडण्यासाठी? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी भाषणात आणि सभेनंतर माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

नक्की वाचा : इंदुरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. यातली काही बोर्ड अज्ञातांनी फाडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यावर जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त करत या मागं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे अजित पवार, छगन भुजबळ यांना शांत राहण्याची तंबी दिल्याचे बोलले जाते. मात्र दुसरीकडे आमचे बोर्डही फाडले जात आहेत. याबद्दल जरांगे पाटील यांनी शंका व्यक्त करत हा मराठा समाजामध्ये असंतोष पसरवण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here