Ajit Pawar : पारनेर : पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात (Politics) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी उलथापालथ झाली आहे. खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा डाव टाकला आहे. मतदार संघातील त्यांचे जुने सहकारी नगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते, माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांच्या हातात घड्याळ बांधत खासदार निलेश लंकेच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम
निलेश लंके यांच्या विरोधात राजकीय मोर्चेबांधणी
मुंबई येथे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन सुजित झावरे, काशिनाथ दाते, विजय औटी, माधवराव लामखडे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल झाला असून खासदार निलेश लंके यांच्या विरोधात अजित पवार यांनी राजकीय मोर्चेबांधणी करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.
अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक (Ajit Pawar)
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, माजी मंत्री अशोकराव सावंत, सचिन पाटील वराळ, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, शिवाजी गुजर आदी उपस्थित होते. पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक आहेत. परंतु सर्वेनुसारच उमेदवार अंतिम करू, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.