Ajit Pawar : पारनेर : राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) शेतकरी बांधवां साठी ४४ लाख शेतकऱ्यांना वीज बील (Electricity Bill) माफी दिली आहे तर येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना टप्याटप्याने दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.
अवश्य वाचा: ‘आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू’-सुजात आंबेडकर
पारनेर येथे संवाद मेळाव्याचे आयोजन
यावेळी मंचावर पारनेर अहिल्यानगर मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, कार्याध्यक्षा अंजली आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी आदी उपस्थित होते.
नक्की वाचा: मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेला स्थगिती,नवे अर्ज स्वीकारणे झालं बंद
अजित पवार म्हणाले की, (Ajit Pawar)
या योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजने मुळे लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली. अश्या या योजनेच्या अंमलबजावणीवर विरोधकानी सातत्याने विरोध केला. ही योजना अंमलात आल्यानंतर आता पैसे येत असले तरी निवडणुकी नंतर योजना बंद केली जाईल, अशी विरोधकांनी अफवा पसरवल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली की, या अर्थसंकल्पात ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समजातील सर्व घटकांना या योजनांचा फायदा होणार आहे. या योजने अंतर्गत सरकार महिलांना १५०० रुपये देते. विरोधी पक्षातील अनेकांनी ही योजना बंद असल्याचा दावा केला असला तरी तुम्ही माझ्या मनगटावर बांधलेल्या राखीची शपथ घेतो की मी ही योजना कधीच बंद होऊ देणार नाही. तसेच सरकारतर्फे रस्ते, वीज, पाणी या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.