Ajit Pawar : नगर : कल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण (Kalyan attack on marathi family case) राज्यभर गाजले आहे. कल्याण येथे एका इमारतीमध्ये अखिलेश शुक्ला याने मराठी (Marathi) माणसांना सराईत गुडांना सांगून मारहाण करायला लावली. अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) हा मंत्रालयात अधिकारी आहे. हे प्रकरण चांगलंच तापल्याने त्याचे पडसाद मंत्रालयातही उमटले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी या घटनेची सभागृहात माहिती देत कारवाईची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अशी खात्री सभागृहात दिली. तर शुक्लावर निलंबनाची कारवाई सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केली.
नक्की वाचा : कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा ; खासदार नीलेश लंके यांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी
मराठी घाणेरड लोकं आहात, असं म्हणून हिणवत होता
कल्याण पश्चिमेकडील अजमेरा हाईट्स योगीधाम बिल्डिंगमधील लता कळवीकट्टे आणि अखिलेश शुक्ला यांच्यात धूप लावण्यावरून वाद झाला होता. यावरून अखिलेश शुक्ला हा लता यांना तुम्ही मराठी घाणेरड लोकं आहात, तुमची इमारतीमध्ये राहण्याची लायकी नाही, असं म्हणून हिणवत होता. तेव्हा शेजारी धीरज देशमुख यांनी मध्यस्थी केली तेव्हा शुक्ला यांची पत्नी त्यांना टकल्या म्हणून चिडवू लागली. आमची आईचा मृत्यू झाल्याने आम्ही केस काढलेत, असं चिडवू नका असं सांगितलं. त्यानंतर तुम्ही फक्त अर्ध तास द्या म्हणून शुक्ला निघून गेला. अखिलेश शुक्ला याने फोन करून सराईत गुंडांना मारहाण करण्यासाठी बोलावलं. शुक्ला गुंडांना घेऊन देशमुख यांच्या घरी गेला त्यांना बाहेर काढत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा गीता शुक्ला या सगळ्यांना मारून टाका सोडू नका म्हणून असं बोलत होती.
अवश्य वाचा : सौंदाळा ग्रामसभेने घेतला आदर्शवत ठराव; शिव्या दिल्या तर होतोय 500 रुपयांचा दंड
अजित पवार म्हणाले (Ajit Pawar)
हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. या महाराष्ट्रामध्ये कोण मराठी माणसावर अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आली ती तपासून तो अधिकारी किती मोठ्याबापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान या राज्यामध्ये ठेवला जाईल अशा पद्धतीने प्रशासन वागेल याबद्दलची खात्र मी सभागृहाला देतो. त्या अधिकाऱ्याव तत्परतने कारवाई करण्याचे आदेश दिले जातील असं अजित पवार म्हणाल
अखिलेश शुक्लाचं निलंबन, मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा (Ajit Pawar)
अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे. एमटीडीसी मधे काम करणारा शुक्ला हा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.
शुक्लाचे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत आत्मसमर्पण
या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला हा पोलिसांच्या ताब्यात आला आहे. अखिलेश शुक्ला हा बेपत्ता होता. अखेर त्याने सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट करत स्वत:ची भूमिका मांडली आहे. त्याने तो व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर खडकपाडा पोलिसांकडे स्वत:चं आत्मसमर्पण केल्याची माहिती आता समोर येत आहे.