Ajit Pawar : राहुरी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) व माजी खासदार प्रसाद तनपुरे (Prasad Tanpure) यांची राहुरी येथील तनपुरे यांच्या निवासस्थानी सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेनंतर मतदारसंघात काही राजकीय (Political) भूकंप होतो की काय? अशी चर्चा सुरू आहे. मात्र, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अशी शक्यता फेटाळली आहे.
नक्की वाचा : किरण काळे प्रकरणाचा सखोल तपास व्हावा; खासदार नीलेश लंके यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी
एका बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी सकाळी राहुरी येथील बाजार समिती येथे शेतकरी भवन व उपहार गृहाचा उद्घाटन सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यानंतर अजित पवार यांनी माजी खासदार प्रसाद तनपूरे यांच्या वाड्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे तसेच सोनाली तनपूरे यांची एका बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. बंद खोलीत काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाही.
अवश्य वाचा : सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी ज्योती गडकरी; दिवटे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली
हर्ष तनपुरे यांचा कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश (Ajit Pawar)
काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेनंतर मतदार संघात काही राजकीय भूकंप होतो की काय असा प्रश्न निर्माण होऊन चर्चेला उधाण आले आहे.