Ajit Pawar : व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar : व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांचे स्पष्टीकरण

0
Ajit Pawar : व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांचे स्पष्टीकरण
Ajit Pawar : व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar : नगर : सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा येथे बेकायदा उत्खननावर कारवाई करीत असताना, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, या व्हिडीओवर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.

नक्की वाचा :मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?

माझा उद्देश त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी असा होता

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.

अवश्य वाचा : ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं (Ajit Pawar)

आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे.

मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.