Ajit Pawar :’राम शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने होईल’:अजित पवार

नगर : कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या प्रकरणी आमदार राम शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने तो मुद्दा सुटेल असे अजित पवार म्हणालेत.

0
'राम शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने होईल' : अजित पवार

Ajit Pawar : नगर : मागील काही कर्जत जामखेडच्या (Karjat Jamkhed) एमआयडीसीच्या (MIDC) मुद्यावरुन आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, राम शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने तो मुद्दा सुटेल असे अजित पवार म्हणालेत.

नक्की वाचा : धोनीची जर्सी होणार निवृत्त; बीसीसीआयचा निर्णय

कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा मुद्दा नियमाच्या चौकटीत बसवून सोडवावा लागेल. तिथे तरुणांना रोजगार कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी जास्त गुंतवणूक कशी होईल,असा महायुतीचा प्रयत्न चालला असल्याचे अजित पवार म्हणालेत. याबाबत आमदार राम शिंदे हे बारकाईने प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी कर्जत जामखेडची एमआयडीसी प्रस्तावीत होती, तिथं नीरव मोदींची जमीन आहे, याबाबत अजित पवारांना विचारले. यावेळी अजित पवार म्हणाले की, नीरव मोदीची भारतात येण्याची शक्यता फार कमी आहे. ते इथे आले तर त्यांच्यावर कारवाई होईल. आपण नियमांच्या चौकटीत बसून एमआयडीसीच्या संदर्भात काम करु, असे अजित पवार म्हणालेत.

अवश्य वाचा : वाळू धाेरणात आणखी सुधारणा करणार : राधाकृष्ण विखे पाटील

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या प्रस्तावित एमआयडीसीचा एकूणच प्रस्ताव रद्दबातल करण्यात आला आहे. संबंधित एमआयडीसीची जागा ही वादग्रस्त असल्याने हा प्रस्ताव रद्दबातल करण्यात येत असल्याचा  निर्णय झाल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here