Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; देवळाली प्रवरा परिसरातून हळहळ व्यक्त

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; देवळाली प्रवरा परिसरातून हळहळ व्यक्त

0

Ajit Pawar : राहुरी : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अचानक विमान अपघातात निधन झाल्याची (Ajit Pawar Plane Crash) बातमी सकाळी आली आणि देवळाली प्रवरा (Deolali Pravara) परिसरात शोककळा पसरली. दिवंगत अजित पवार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असणाऱ्या देवळाली प्रवराचे भाचे होते. देवळालीप्रवरा हे त्यांचे आजोळ आहे.

नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?

आज शहर बंद

दिवगंत नेते अजित पवार यांच्या दुख:द निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देवळालीप्रवरात आज शहर बंद ठेवण्यात आले आहे. राहुरीत ही बंद पूकारण्यात आला. ठिकठिकाणी त्यांना श्रध्दांजली अर्पण करणारे बोर्ड लागले आहेत.

आजोळी येताना ओळखीच्या माणसांना आवर्जून भेटायचे (Ajit Pawar)

नगर जिल्ह्याला आणि विशेषतः देवळाली प्रवरा परिसराला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमीच अभिमान आणि आदर वाटत आला आहे. दादांचे बालपण देवळाली प्रवरात गेले असल्याने या भूमीशी त्यांची नाळ घट्ट होती. आजोळी येताना ते बालसवंगड्यांना, जुन्या ओळखींच्या माणसांना आवर्जून भेटायचे.

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; देवळाली प्रवरा परिसरातून हळहळ व्यक्त
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; देवळाली प्रवरा परिसरातून हळहळ व्यक्त

“दादा, मी तुमच्या मामाच्या गावातला आहे,” असे कुणी सांगितले, की ते आपुलकीने चौकशी करायचे. काय अडचण आहे, काय काम आहे, कशी मदत करता येईल, हे विचारायचे. मंत्रालयात राहुरी तालुक्यातील कोणी भेटले की ते आर्वजून तू तर माझ्या आजोळच्या गावाचा असा उल्लेख करायचे. आपल्या आजोळाबद्दल म्हणजेच देवळाली प्रवराबद्दल दादांना विशेष जिव्हाळा होता.

काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुरी बाजार समितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केले होते. त्या दौऱ्यात आवर्जून देवळालीप्रवरास त्यांनी भेट दिली होती. आजोळच्या सत्काराने दादा भारावून गेले होते. श्रीरामपूरकडे जाताना ते आजोळी थांबून चहा-पाणी घेत असल्याच्या आठवणी आजही गावकऱ्यांच्या मनात ताज्या आहेत.

दादा वेळेचे काटेकोर पालन करणारे, कर्तृत्वसंपन्न आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दादांचे अकाली मृत्यू ने महाराष्ट्रातील एक हिरा आपण गमावला असल्याची भावना आहे.

अजितदादा एक कामाने झपाटलेले व्यक्तीमत्व होते. ग्रामीण प्रश्नांची जाणीव असलेले मोठे नेते होते. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे प्रेमळ नेते होते. आमचा आधार आज नाहीसा झाला. महाराष्ट्राचे कधीही न भरुन येणारे नूकसान झाले आहे. त्यांच्या जाण्यावर विश्वास ही बसत नाही.

प्राजक्त तनपुरे, माजीमंत्री

अविरत कष्ट करणारे, प्रभावी नेत्याला आपण मुकलो आहोत. राज्याच्या नेतृत्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काळाने अकाली नेतृत्व हिरावून घेतले. परत असे नेतृत्व निर्माण होणे अवघड आहे.

अरुण तनपुरे, सभापती, राहुरी बाजार समिती