Ajit Pawar : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट; शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाची हकालपट्टी

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट; शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाची हकालपट्टी

0
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट; शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाची हकालपट्टी
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट; शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाची हकालपट्टी

Ajit Pawar : संगमनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात (Ajit Pawar plane crash) दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोक करत असताना सर्व राजकीय पक्ष मतभेद बाजूला ठेवून अजितदादा यांना श्रद्धांजली अर्पण करत होते. मात्र, संगमनेरात सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचा शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने सोशल मीडियावर (Social Media) वादग्रस्त पोस्ट टाकत अजितदादा पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?

अमोल खताळ यांच्या सूचनेवरून हकालपट्टी

या घटनेची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी, यासाठी शहर पोलीस ठाण्यात हजर राहून कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर फटांगरे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे, मात्र यापूर्वी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेवरून शिवसेना (शिंदे गट) उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिनेश फटांगरे यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की,(Ajit Pawar)

संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना दिनेश फटांगरे याने सोशल माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट करत गरळ ओकली. त्यामुळे सर्वांचाच संतापाचा बांध फुटला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सर्व पक्षीय कार्यकर्ते, युवक संघटना यांनी दिनेश फटांगरे यांचा निषेध करत त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याचा शोध घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी शहर पिंजून काढले मात्र तो मिळून आला नाही. तसेच फटांगरे याच्या विरुद्ध उत्तर नगर महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


यावेळी शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण कानवडे, मनीष माळवे, किरण घोटेकर, वैशाली राऊत, संध्या खरे, सरला भूजबळ, भाऊ म्हस्के, रईस पठाण, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, सुभाष राहणे, हर्षल राहणे, अमजद शेख, किरण पाटणकर, सुभाष दिघे, विजय पांढरे, दिनेश डफेदार, गजानन भोसले, प्रसाद गोरे, बाबू आवारी, अभिषेक तांबे, प्रतीक गाडेकर, शुभम डांगे, अक्षय भालेराव, अक्षय आव्हाड, सचिन पवार, तुषार वाळे, दिपक रणशेवरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.