Ajit Pawar | राहुरी : देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील बाजारतळावर स्व. अजित पवार (Ajit Pawar) यांना जन्मभुमीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेनंतर अजित पवार यांच्या आठवणीने त्यांचे नातेवाईक असलेले सत्यजित कदम व शैलेंद्र कदम यांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा – शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
अजित पवार यांच्या कार्याचा गौरव (Ajit Pawar)
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना, “माणूस जातो, पण त्याच्या कार्याची आणि लोकांच्या मनात राहिलेल्या प्रतिमेचीच खरी शाश्वती असते,” असे विचार मांडले. देवळाली प्रवरात स्व. अजितदादा पवार यांच्या नावाने क्रीडा संकुल उभारण्यात यावे, तसेच ग्रामीण रुग्णालयालाही स्व. अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. ही श्रद्धांजली सभा ग्रामसभा म्हणून गृहित धरावी, असा ठरावही यावेळी मांडण्यात आला.

अवश्य वाचा – आयुष्मान भारताच्या निर्मितीला आणखी गती देणारा अर्थसंकल्प – अनुजा साळवी
क्रीडा संकुल व ग्रामीण आरोग्य केंद्र उभारणार (Ajit Pawar)
डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या परिसरात स्व. अजित पवार यांच्या स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी दिली. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी श्रद्धांजली अर्पण करताना देवळाली प्रवरात क्रीडा संकुल व ग्रामीण आरोग्य केंद्र उभारण्यात येईल व त्या दोन्ही संस्थांना स्व. अजित पवार यांचे नाव देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यांची उपस्थिती (Ajit Pawar)
या सभेला आमदार हेमंत ओगले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, करण ससाणे, सचिन गुजर, अरुण तनपुरे, सुखदेव मुसमाडे, मदिना शेख, शहाजी कदम, शिवाजी ढवळे, बाबा महाराज मोरे, दत्ता पा. कडू, रफिकभाई शेख, सुरेंद्र थोरात, संतोष चोळके, आप्पासाहेब ढुस, प्रशांत मुसमाडे, डॉ. अशोक मुसमाडे, कृष्णा मुसमाडे, रावसाहेब मुसमाडे, डॉ. संदीप मुसमाडे, अनंत कदम, दीपक त्रिभुवण, बाबासाहेब वाळुंज, वैभव गाडे, वैभव गिरमे, पोपटराव खाडे, राजू चव्हाण, समीर पठाण, केदारनाथ चव्हाण, गोरख चव्हाण महाराज, ललित चोरडिया, अशोक खुरुद,अजित कदम आदींनी श्रद्धांजली वाहिली.



