Ajit Pawar : कर्जत: कर्जत शहरात विविध ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे श्रद्धांजली फलक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावले असताना कर्जत नगरपंचायतीने (Karjat Nagar Panchayat) मंगळवारी (ता.३) ते फलक काढले. या घटनेचा आम्ही कर्जतकर म्हणून निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे (Youth Nationalist Congress) जिल्हाध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली. कर्जत शहरात असे विना परवानगी अनेक फलक असून राज्याची मोठी हानी झालेल्या व्यक्तीमत्वाचे श्रद्धांजली फलकच नगरपंचायतीस खुपले नाही का? असा प्रश्न देखील उभा करीत कर्जत नगरपंचायतीचा निषेध नोंदविला.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
श्रद्धांजली फलक कर्जत नगरपंचायतकडून काढण्याचा सपाटा
मागील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने शोकसागरात बुडाला असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रद्धांजली वाहणारे फलक कर्जत शहरासह तालुक्यात तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लागले आहे. मात्र, कर्जत शहरातील श्रद्धांजली फलक कर्जत नगरपंचायतीने काढण्याचा सपाटा मंगळवारी दुपारपासून सुरू केला.
हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?
कर्जतमध्येच ही कार्यवाही का? प्रशासनास सवाल (Ajit Pawar)
कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व विद्यमान पदाधिकारी यांनी केवळ राजकीत सूडबुद्धी दाखवतात जाणून-बुजून अजित पवार यांचे फलक काढून ते ट्रॅक्टरमध्ये आडवे-तिडवे टाकत स्वर्गीय अजित पवार यांच्या फोटोची विटंबना केलेली आहे. ही गोष्ट निषेधार्थ असून कर्जत शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळे फलक आजमितीस तसेच उभे आहे केवळ श्रद्धांजलीचे फलकच या नगरपंचायतीला सहन होत नव्हते का? असा प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे फलक लावले असताना कर्जतमध्येच ही कार्यवाही का? असा सवाल पप्पू धुमाळ यांनी प्रशासनास विचारला. प्रशासनाने यावर योग्य ती पावले उचलत काढलेले सर्व फलक पुन्हा त्याच जागी लावावी. अन्यथा पुढील काही दिवसात याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धुमाळ यांनी दिला आहे.



