Ajit Pawar : अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले

Ajit Pawar : अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले

0
Ajit Pawar : अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले
Ajit Pawar : अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले

Ajit Pawar : संगमनेर: शहरात आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या शोकसभेत (Condolence meeting) राजकीय (Political) मतभेद विसरून सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नक्की वाचा: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; खासदार नीलेश लंके यांची माहिती

सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार डॉ सुजय विखे, उद्योगपती राजेश मालपाणी, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, बाबा ओहोळ, राष्ट्रवादीचे दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, कपिल पवार, देवराज थोरात, पृथ्वीराज थोरात, पांडुरंग घुले ,बाळासाहेब गायकवाड, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा: 32 तास अन् बघ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत ‘वार’

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या भाषणात सांगितले की, (Ajit Pawar)

अजितदादा आणि मी एकत्र मंत्रिमंडळात काम केलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यांनी अनेक तरुणांना राजकारणात संधी दिली. त्यामुळे राज्यात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

Ajit Pawar : अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले
Ajit Pawar : अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, अजितदादा राजकारण आणि व्यवसाय यामध्ये समतोल राखायचे. राजकारणात येताना आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.

आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, माझ्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून झाली असल्याने दादांशी माझा जवळचा संबंध आला. २०१४ सालीच दादांनी मी आमदार होणार असल्याचे भाकीत केले होते.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राजकारणात अनेक जण गोड बोलतात, मात्र दादा नेहमी स्पष्ट बोलायचे. सुरुवातीला त्यांच्या स्वभावाचा राग यायचा, पण नंतर हीच सवय किती योग्य आहे, हे समजले. त्यामुळेच मी आणि सुजय विखे स्पष्टच बोलतो. शोकसभेत सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.