Ajit Pawar : अजित पवार असते, तर बारावा अर्थसंकल्प मांडला असता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar : अजित पवार असते, तर बारावा अर्थसंकल्प मांडला असता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Ajit Pawar : अजित पवार असते, तर बारावा अर्थसंकल्प मांडला असता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar : अजित पवार असते, तर बारावा अर्थसंकल्प मांडला असता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar : नगर : सभागृहात नजर गेली की दादा खुर्चीत बसलेले दिसायचे. आज मात्र ते आपल्याच नाहीत याची खंत आहे’, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत अजित पवारांच्या (Ajit Pawar) निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. ‘बोलणं कुठून सुरू करावं हेच कळत नाही. मनात प्रचंड वादळ, अशा प्रकारचा शोक प्रस्ताव मांडावा लागेल अशी कल्पनाच केली नव्हती. काही वेदना कधीच कमी होत नाहीत, अशीच ही वेदना आहे. अजितदादांनी विविध राजकीय क्षेत्रांना पादाक्रांत केलं. दादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली म्हणजे काय ते खऱ्या अर्थाने समजलं’, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. दादा वरकरणी जरी कठोर वाटायचे पण ते आतून प्रेमळ होते. अजित पवार महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री होते. भविष्यात त्यांच स्वप्न कधीतरी पूर्ण झालं असतं असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा: हा तर हनीट्रॅपचा प्रकार; अभिषेक कळमकर प्रकरणात निलेश लंकेंचा दावा

दादा कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे बघत नव्हते

सभागृहात दादा माझ्या शेजारीच बसलेले असायचे. अर्थसंकल्पात (Budget) कठोर निर्णय घ्यायला दादा मागेपुढे पाहायचे नाहीत. मित्रशोक हा आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. लाडकी बहीण योजनेनंतर, अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली होती. आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं. आता त्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दादांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता होती. मात्र, कधी वेळ न चुकवणाऱ्या दादांनी यावेळी आयुष्याची वेळ चुकवली असे सांगत अजित पवार महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री होते. भविष्यात त्यांच स्वप्न कधीतरी पूर्ण झालं असतं असे फडणवीस म्हणाले.

अवश्य वाचा: राजधानी दिल्ली हाय अलर्टवर, ISIशी संबंधित 8 संशयितांना अटक

दादा खऱ्या अर्थाने माझे दादाच होते (Ajit Pawar)

अजित पवार असते तर बारावा अर्थसंकल्प मांडला असता. दादांचा आणि माझा जन्मदिवस एकाच दिवशी असतो. दादा खऱ्या अर्थाने माझे दादाच होते. २०१४ नंतर दादांशी आमचं भावनिक नातं निर्माण झालं. दादांशी आमचं केवळ स्ट्रॅटेजिक नातं नव्हतं तर भावनिक नातं होतं. दादांचं काम हे १० ते १५ मिनाटांचं असायचं. कुठलंही काम कागदावर असायचं, काय बोलायचं ते लिहिलेलं असायचं’, असे फडणवीसांनी आठवणींचा उजाळा देताना सांगितले.