Ajit Pawar : नगर : नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकासकामांसाठी राज्य शासनाने नव्याने ८५ कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकासकामांसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सदर निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकासकामाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे.
हे देखील वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा
नगर शहरासाठी इतिहासातील सर्वात मोठा निधी (Ajit Pawar)
आमदार संग्राम जगताप यांनी मागील काही काळात वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून नगर शहरासाठी इतिहासातील सर्वात मोठा निधी खेचून आणण्यात यश मिळाले आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे आमदार जगताप यांच्या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री निधी मंजुर करीत आहेत. नगर शहरातील विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी नुकताच पहिल्या टप्प्यातील १५० कोटीचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यापाठोपाठ आता नगर शहरासाठी ८५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नगर शहरात येत्या काळात जवळपास २३५ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागणार आहेत. आमदार जगताप यांनी भिंगार शहराच्या विकासाचा शब्दही खरा करून दाखविला आहे. भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून तब्बल ९ कोटीचा भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे भिंगारचाही कायापालट होण्यास मदत होणार आहे.
नक्की वाचा : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी
आमदार जगतापांचा राजकीय निर्णय नगरसाठी लाभदायी (Ajit Pawar)
राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांची साथ देण्याचा राजकीय निर्णय घेतला त्यांनी घेतलेला निर्णय नगरसाठी लाभकारक ठरला आहे. पवारांनी आमदार जगताप यांच्या प्रस्तावानुसार नगर शहराच्या विकासासाठी निधी देताना हात सैल सोडले आहेत त्यामुळे शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.
आमदार जगतापांना भिंगारच्या विकासाचा विश्वास
भिंगार शहर छावणी परिषदेकडे असल्याने कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी खूप काथ्याकूट करावी लागते. विकास करताना विविध परवानग्या मिळवताना थेट दिल्लीपर्यंत विषय जातो. अशावेळी भिंगारमध्ये काम करताना प्रचंड मेहनत करावी लागते. मी भिंगारकरांना शब्द दिलेला असल्याने तो पाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आमदार निधीतून भिंगारमध्ये अनेक विकासकामे केली. आता भिंगारला प्रथमच राज्य शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, त्यामुळे भिंगारचाही चेहरामोहरा येत्या काळात बदललेला दिसेल, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.