Ajit Pawar 6 Connection:अजित पवार यांचं ६ क्रमांकाशी नेमकं कनेक्शन’ काय? जाणून घ्या… 

0
Ajit Pawar 6 Connection:अजित पवार यांचं ६ क्रमांकाशी नेमकं कनेक्शन' काय? जाणून घ्या... 
Ajit Pawar 6 Connection:अजित पवार यांचं ६ क्रमांकाशी नेमकं कनेक्शन' काय? जाणून घ्या... 

नगर: २८ जानेवारीला तो काळा दिवस उलगडला. सकाळीच अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाल्याची बातमी समोर आली आहे. हे वृत्त समजताच महाराष्ट्र निशब्द झाला. आज बारामतीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral in Baramati) करण्यात आलेत. अजित पवार हे त्यांची बोलण्याची शैली, त्यांचे निर्णय आणि राजकीय कारकिर्दीसाठी ओळखले जातात. सध्या अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील “६६६ कनेक्शन” ची जोरदार चर्चा होत आहे.आता अजित पवारांचं ६ क्रमांकाशी (Ajit Pawar 6 Connection) काय नेमकं कनेक्शन होतं ते जाणून घेऊ…

नक्की वाचा: अजित पवारांच्या निधनामुळे ‘झेडपी’ निवडणुका पुढे जाणार का? निवडणूक आयोग काय म्हणाले?  

६ क्रमांकाचा योगायोग काय ? (Ajit Pawar 6 Connection)

सध्या अजित पवार यांचं ‘६६६’ या क्रमांकाशी असलेल्या ‘कनेक्शन’ ची चर्चा होत आहे. अनेकजण याला त्यांच्या आयुष्यातील एक विचित्र योगायोग म्हणत आहेत. अजित पवार सध्या हे ६६ वर्षांचे होते. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीचे ६ महिने ६ दिवस आधी त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा केला. राजकारणात असे योगायोग काही नवीन नाहीत, परंतु यावेळी ही चर्चा त्यांच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीचे पैलू उलगडणारी ठरली आहे.

अवश्य वाचा: राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन,बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

अजित पवार ६ वेळा झाले उपमुख्यमंत्री (Ajit Pawar 6 Connection)

अजित पवार हे सहा महिने सहा दिवसांपूर्वी ६६ वर्षांचे झाले होते. त्यांनी ६ वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले म्हणून त्यांचा क्रमांक ६ शी विशेष संबंध असल्याचं म्हटलं जातं. तसेच ते ६६ वर्षांचे होते. काल (ता.२८) जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या विमान अपघातामुळे त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून तब्बल ६ वेळेस काम केलेल्या अजित पवारांसाठी मुख्यमंत्री होणे एक स्वप्न होते. मात्र त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या साधेपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांनी सत्तेत असताना विविध पदे भूषविली. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची अजित दादांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसताना पाहण्याची इच्छा अपूर्णच राहिली.

सध्या अजित पवार आणि ६६६ क्रमांकाशी असलेल्या ‘कनेक्शन’ बद्दल चर्चा जरी सुरू असली तरी, तो केवळ योगायोग आहे.