Ajit Pawar : विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर योजना पुढे चालू राहणार : अजित पवार 

Ajit Pawar : विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर योजना पुढे चालू राहणार : अजित पवार 

0
Ajit Pawar : विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर योजना पुढे चालू राहणार : अजित पवार 
Ajit Pawar : विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर योजना पुढे चालू राहणार : अजित पवार 

Ajit Pawar : पारनेर : माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मी बंद होऊ देणार नाही, पण त्याकरता तुम्हालाही काही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. येत्या विधानसभेमध्ये (Assembly) महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं, तर पुढे या योजना चालू राहणार आहेत. सरकार दुसर आलं तर या योजना बंद करायचं, असं म्हणतील मग या योजनेचा उपयोग काय, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. पारनेर येथे ‘माझी लाडकी बहीण योजने’च्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, ज्या महिला योजनेपासून काही कागदपत्रांमुळे दूर राहणार आहेत. त्यावर तोडगा काढून प्रत्येकीला लाभ मिळवून देण्यासाठी शासन (Government) स्तरावर प्रयत्न करणार आहे. एक लक्षात आलं की महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यासाठीच महिलांना सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.

नक्की वाचा: ‘ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत’ – लक्ष्मण हाके

यांची उपस्थिती (Ajit Pawar)

या कार्यक्रमानिमित्ताने राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंढे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, माजी मंत्री अशोकराव सावंत, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पगार, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या संध्या सोनवणे, भाजप कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, काशीनाथ दाते, वसंत चेडे, भाजप तालुकाध्यक्ष राहूल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, सचिन पाटील वराळ, महिला तालुका अध्यक्षा सुषमा रावडे, मयुरी औटी, सुभाष दुधाडे, शिवसेना पारनेर तालुका प्रमुख विकास रोहकले, आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये जाण्यावर बंदी नाही

पारनेर येथून योजनेचा प्रारंभ करताना अजित पवार म्हणाले (Ajit Pawar)

शासकीय योजना या सर्वसामान्यांसाठी राबवल्या जात आहेत. मी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रात ओळख आहे. महिलांसाठी यावर्षीच्या बजेटमध्ये अत्यंत महत्त्वाची माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली असून त्यामुळे राज्याचे बजेट सादर करत असताना वेगळा आनंद मिळाला आहे. राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा महत्त्वपूर्ण योजना आम्ही आणल्या आहेत. माझी लाडकी बहीण योजना ही जातीपातीला गृहीत धरून दिलेली नाही. ती सर्व गोरगरीब महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. योजनेचा लाभ घेत असताना महिलांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फॉर्म भरला तरी जुलैपासून ऑगस्टचे पैसे आम्ही खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करण्याचे कारण नाही. खऱ्या अर्थाने सर्व घटकातील महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना आहे. शासन अशा अनेक योजना महिलांसाठी राबवत आहे. विरोधक आमच्यावर टीका करतात म्हणतात की हा चुनावी जुमला आहे पण तसे नाही. सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना आम्ही अभ्यास करून आणल्या आहेत. मग पूर्वीचे जे राज्यकर्ते होते त्यांनी या योजना का नाही आणल्या. माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेण्यासाठी बहिणीकडून एक रुपयाही आम्ही घेत नाही. त्यासाठी वेगळे पैसे आम्ही फॉर्म भरून देणाऱ्याला देत आहोत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळे माझी लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्याची जबाबदारी आमच्या सरकारने घेतली आहे. शेतकऱ्यांसाठी वीज मोफत देणार असून सौर प्रकल्पासाठी सुद्धा आता अनुदान देणार आहे. तसेच महिला बचत गटांना तीस हजार रुपयापर्यंत अनुदान देत आहे. तसेच महिलांना पिंक कलरची तीन चाकी रिक्षा आम्ही देत आहोत. या योजना कधीही बंद होणार नाही, हा अजितदादाचा वादा आहे, असे अजित पवार म्हणाले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here