Ajit Pawar : त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले : अजित पवार

Ajit Pawar : त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले : अजित पवार

0
Ajit Pawar : त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले : अजित पवार
Ajit Pawar : त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले : अजित पवार

Ajit Pawar : श्रीगोंदा : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पासून शेतकऱ्यांच्या वीज बिल माफी, मुलींना उच्च शिक्षण मोफत देणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी योजना आणल्याने मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री यांच्यासह सत्ताधारी मंत्रिमंडळातील सर्वांनी कौतुक केले. जनतेच्या कामासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. सरकारमध्ये गेल्याने राज्याच्या हिताचे निर्णय घेता आले. मात्र, विरोधी पक्षातील काहींना या योजना आवडल्या नसल्याने त्यांच्या पोटात दुखायला लागले. या योजनांबाबत विरोधकांनी हा चुनावी जुमला असल्याचे सांगत, या योजनेबद्दल टीका सुरू केली. मात्र, अजित पवार हा शब्दाला पक्का असून आणलेल्या योजना अडचणीत येऊ देणार नाही. पुढील काळात योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महायुतीला कायम सत्तेत ठेवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी करत उपस्थित महिलांशी संवाद साधत महिलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

Ajit Pawar : त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले : अजित पवार
Ajit Pawar : त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले : अजित पवार

नक्की वाचा: ‘ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत’ – लक्ष्मण हाके

योजना कार्यान्वित केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन (Ajit Pawar)

श्रीगोंदा येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या पटांगणात लाडकी बहीण योजना कार्यान्वित केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here