Ajit Pawar : अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी

Ajit Pawar : अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी

0
Ajit Pawar

Ajit Pawar : नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जनसंवाद यात्रेदरम्यान मराठा आंदोलकांनी हिंगोलीतील वसमतच्या सभेत गोंधळ घातला. उपमुख्यमंत्री अजित पवार स्टेजवर जाताच काही मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबतची (Maratha Reservation) भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. घोषणाबाजी करणाऱ्या १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर सभेवेळी हा गोंधळ झाला होता. आता हिंगोलीच्या वसमतच्या सभेवेळीही असाच प्रकार घडला आहे.

नक्की वाचा: बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

भाषणाला उभे राहताच आंदोलकांनी घातला गोंधळ

वसमतमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात जन सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने वसमत शहरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आजित पवार भाषणाला उभे राहताच मराठा आंदोलकांनी सभेत गोंधळ घातला आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी स्टेज परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.

अवश्य वाचा: दीपक केसरकरांच्या वक्तव्यावरून संजय राऊत भडकले; म्हणाले …

पोलिसांचा उडाला गोंधळ (Ajit Pawar)

अचानक मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दाखल झाल्याने पोलिसांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी मध्यस्ती करत आंदोलकांना सभा स्थळापासून बाजूला नेत हे आंदोलन शांत केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. परंतु, पोलीस बळाचा वापर करून आम्हाला निवेदन देऊ दिलं जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.