Chhagan Bhujbal : अजित पवार (Ajit Pawar) हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निवडणूक लढविणार, अजित पवार मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत,असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) जे झाले ती व्यथा त्यांनी मांडली आहे. मी ७८ वर्षांचा आहे. मग मला ते लढायला का सांगतात, वय आहे तो काही मुद्दा नाही, असे भुजबळ म्हणाले.
नक्की वाचा : सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट,गणपती मंडपावर दगडफेक
अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा (Chhagan Bhujbal)
बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. ही वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर विरोधक, सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार लढणार की नाही यावर वक्तव्य केले आहे.
अवश्य वाचा : चष्म्यापासून मिळणार मुक्ती! नवीन ‘प्रेस्वू आयड्रॉप्स’ला केंद्राची मंजुरी
मंत्री छगन भुजबळ यांची मोठी प्रतिक्रिया (Chhagan Bhujbal)
अर्थखात्यावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्याच्या मुद्द्यावर देखील मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार सर्वांचे पैसे देणार, जशी पुंजी जमा होते तसे देणार आहे. उशीर होणे हे काही नवीन आहे का ? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळातही ३-३ वर्षे उशीर होत होता, प्राध्यान्य कशाला हे ठरवले जाते, असे भुजबळ म्हणाले. महायुतीच्या तिन्ही घटकांना चांगले यश मिळवायचे असेल तर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करू नये. विरोधकांना खाद्य देऊ नये,असा सल्लाही भुजबळ यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तशा सूचना दिल्या आहेत, असं देखील त्यांनी सांगितले.