
नगर : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं नाव समोर आलं आहे. या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला आहे. नैतिकतेच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी राजीनााम द्यावा,अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांचे हे प्रश्न पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी राजीनामाप्रकरणी मुंडेंनाच प्रश्न विचारा,असं म्हटलं आहे.
नक्की वाचा : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी;’या’ दिवसापर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांची काउंटर विक्री बंद

“आर. आर. पाटील आणि विलासरावांनी राजीनामा दिला होता.मग ही नैतिकता धनंजय मुंडे का दाखवत नाहीत?”असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारला.त्यावर अजित पवार यांनी उत्तर देत सांगितले की, “आपण त्यांनाच प्रश्न विचारा. तुमच्या आमच्या पक्षाचं असं काही नसतं. तेही काही गोष्टी बघत असतील ना. त्यांचं म्हणणं आहे की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.” असं म्हणत अजित पवारांनी राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
अवश्य वाचा : १८व्या ‘प्रतिबिंब’ चित्रपट महोत्सवाला सुरुवात
धनंजय मुंडे यांनी काय स्पष्टीकरण दिलं? (Ajit Pawar)
“मी नैतिक आहे आणि देशमुख हत्येप्रकरणात मी दोषी नाही आणि हे माझे मत मला माझ्या वरिष्ठांना सांगावे लागेल”,असं स्पष्टीकरण दोन आठवड्यांपूर्वी धनंजय मुंडेंनी दिलं होतं.
बुद्धीला पटले नाही म्हणून राजीनामा दिला…(Ajit Pawar)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यावर बुद्धीला पटले नाही म्हणून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.