
Ajit Pawar Death in Baramati Plane Crash : पारनेर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व नामदार अजितदादा पवार यांच्या अकस्मात निधनामुळे (Ajit Pawar Death in Baramati Plane Crash) संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, अजितदादांना (Deputy Chief Minister Ajit Pawar) भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी पारनेर शहरातील (Parner City) सर्व व्यापारी प्रतिष्ठाने आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
पारनेर शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त
अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच पारनेर शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनावर पकड असलेला एक धडाडीचा नेता आणि सामान्यांचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी हरपल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आणि त्यांना आदरंजली वाहण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व व्यवहार बंद (Ajit Pawar Death in Baramati Plane Crash)
व्यवहार ठप्प, शहरात शुकशुकाट सकाळपासूनच पारनेर शहरातील मुख्य बाजारपेठ, कापड बाजार, सराफ कट्टा आणि अन्य व्यावसायिक क्षेत्रात शांतता पसरली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने) वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. पारनेरमधील सर्व व्यापारी संघटना आणि नागरिक या बंदमध्ये सहभागी झाले असून, “दादांना हीच खरी श्रद्धांजली” असल्याचे भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.शहरातील मुख्य चौकात स्थानिक नेते आणि नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून,
अजितदादांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.


