नगर: महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री,कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या अजित पवारांचं (Ajit Pawar Death)२८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्र या घटनेमुळे शोकाकुल झाला. मात्र अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच एक लाजिरवाणी घटना मंत्रालयात घडली. अजितदादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाइल्सवर दुपारी ४ वाजता सह्या (Signing of files at 4 pm) करण्यात आल्या आणि ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटप (Distribution of minority status certificate) करण्यात आलं आहे. अचानक एकाच वेळी ह्या सर्व प्रलंबित अर्जांना मंजुरी दिल्याने हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे.
नक्की वाचा: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
‘त्या’ फाईलवर सही कोणाची ? (Ajit Pawar Death)Politics

अजित पवार ज्या फायलींवर मंत्री म्हणून विचार करीत होते, त्याच फायलींवर कोणताही मागचा पुढचा विचार न करता मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी सह्या केल्याचा दावा केला जात आहे. हा सर्व प्रकार अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच घडल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेली जी ७५ प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली. त्या सर्व प्रमाणपत्रांवर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही आहे.
अवश्य वाचा: महायुती सरकारचा यू टर्न! शासकीय रुग्णालयात यापुढेही मोफतच उपचार
नेमकं प्रकरण काय ? (Ajit Pawar Death)
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्यांक खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिव्य प्रताप केला. ज्या फायलींना ऑगस्ट महिन्यापासून स्थगिती देण्यात आली होती, किंबहुना त्यावर निर्णय घेण्यात आले नव्हते, त्याच फायलींवर अधिकाऱ्यांनी मागे पुढे न पाहता स्वाक्षऱ्या केल्या. धक्कादायक गोष्ट म्हणजे, यातील पहिले प्रमाणपत्र अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिले गेले. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी ७५ प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. या प्रमाणपत्रांना अल्पसंख्यांक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे. महत्त्वाचे म्हणजे शासकीय कार्यालयांची वेळ संपल्यानंतरही साडे सहा आणि सात वाजताही या फायलींवर सह्या झाल्या आहेत.
‘पोदार’च्या २५ शाळांना २९ जानेवारी या एकाच दिवशी अल्पसंख्याकचा दर्जा देण्यात आलेला आहे हे विशेष. स्वामी शांती प्रकाश आणि देव प्रकाशच्या चार शाळांना देखील लाभ देण्यात आला आहे. सेवादास महाराज शिक्षक प्रसारक मंडळ यवतमाळला अजित पवार यांच्या निधनादिवशीच प्रमाणपत्र देण्यात आले. एकंदर अजित पवार यांच्या मृत्यूदिवशीच सात शाळांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.



