Ajit Pawar: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार

0
Ajit Pawar:
Ajit Pawar:"मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल"-अजित पवार

नगर : राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्र्यांना दिला आहे. तसेच, पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघांमध्ये काढावीच लागतील, अशी अट देखील त्यांनी घातली आहे. नागपूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar) चिंतन शिबीर (NCP’s thinking camp) आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदारांसह वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या चिंतन शिबिरातून मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते.

नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये ठराविक जागीच गोमांस का आढळून येतयं ?
अजित पवार म्हणाले की, आपल्या पक्षाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरात तुम्हा सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज माझं मन खूप भरून आलं आहे. या सभागृहात आपले जवळपास पाचशे वरिष्ठ पदाधिकारी, नेते, सहकारी उपस्थित आहेत. मी आजूबाजूला पाहतो तेव्हा मला गर्दी दिसत नाही, मला माझं कुटुंब दिसतं. तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी लाखो लोक उभे आहेत, आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे मला नव्या उमेदीने, नव्या आशेने पुढे जाण्याची ताकद मिळते.

अवश्य वाचा :  शिरवळ मध्ये तरुणावर गोळीबार;घटना सीसीटीव्हीत कैद  

‘चिंतन शिबिर केवळ पुढच्या निवडणुकीसाठी नाही’ (Ajit Pawar)

आज हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या निवडणुकीसाठी नाही, तर पुढच्या पिढीसाठी आहे. आज फक्त भाषणं करून वेळ घालवायचा नाही. आज प्रामाणिक चर्चा, धाडसी कल्पना आणि ठोस निर्णय घ्यायचे आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्व मिळून जो आराखडा ठरवू, त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानाने मांडणार आहोत, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.

… तर आपला पक्ष  लोकांच्या जवळ राहील – अजित पवार  (Ajit Pawar)

अजित पवार पुढे म्हणाले की, संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाही, ती तळागाळातून बांधली जाते. म्हणून मी ठामपणे सांगतो, प्रत्येक नेत्याने आणि पदाधिकाऱ्याने काही ठराविक प्रकारचे संवादाचे टचपॉइंट लोकांबरोबर ठेवले पाहिजेत. बुथ-स्तरीय संवाद, प्रभाग सभा, जनसंवाद शिबिरे, राष्ट्रवादी परिवार मिलन, महिला बचतगट बैठक, आणि उद्योग/रोजगार सुविधा शिबिरे हे आपण वर्षभर शिस्तीने केले, तर आपला पक्ष नेहमी लोकांच्या जवळ राहील. कोणत्याही नागरिकाला असं वाटता कामा नये की राष्ट्रवादीचे नेते केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात.