Ajit Pawar | मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकार १०० टक्के रक्कम भरणार – अजित पवार

0
Ajit Pawar | मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकार १०० टक्के रक्कम भरणार - अजित पवार
Ajit Pawar | मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकार १०० टक्के रक्कम भरणार - अजित पवार

Ajit Pawar | नगर  : लाडकी बहिण योजनेसंदर्भात महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात नगर जिल्ह्यातून केली आहे. नगर जिल्हा माझे आजोळ असून माझा जन्म देखील याच जिल्ह्यात झाला आहे. आता मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी १०० टक्के रक्कम सरकार भरणार आहे. चांगल्या कामाला पाठींबा दिला पाहिजे. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) नेहमीच शहर विकासाचे कामे घेवून येत असतात व ते मार्गी लावून देखील घेतात. प्रशासनाने जर लाडकी बहीण योजनेबाबत अर्ज भरताना पैसे मागितल्यास थेट त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

अवश्य वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये जाण्यावर बंदी नाही

कार्यक्रमाला यांची उपस्थिती (Ajit Pawar)

नगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांशी संवाद साधला.  यावेळी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर. माजी उपमहापौर गणेश भोसले, कुमार वाकळे, अविनाश घुले, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

नक्की वाचा: ‘ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत’ – लक्ष्मण हाके

विरोधी पक्षाचा चांगल्या योजनांना विरोध (Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, महिला आर्थिक दृष्ट्या म्हणाव्या तेवढ्या सक्षम नाही. त्यांना सक्षम करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे प्रगतशील राज्य आहे, माझी लाडकी बहिण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांना महिन्याला १५०० देण्यात येणार आहे. या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला व मुलाबाळांना आर्थिक हातभार लावतील. महिला आपल्या कुटुंबासाठी झटत असतात. गरिबांची मला जाणीव आहे. या योजनेत कोणतीही जातपात धरली नसून सरसकट २१ ते ६५ वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळेल. आता वर्षातून ३ गॅस सिलेंडरचे पैसे सरकार महिलांच्या खात्यावर जमा करणार आहे. मात्र, विरोधी पक्ष चांगल्या योजनेला विरोध करत आहे.  लाडकी बहीण योजनेबरोबरच लाडक्या भावासाठी राज्य सरकार निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना आम्ही वीजबिल माफ केले आहे. आता इथून पुढे शेतकऱ्यांना साडेआठ लाख सोलर पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी चांगले नियोजन करून शासनाच्या योजनाची माहिती महिलांना व्हावी यासाठी महिला संवाद मेळाव्याचे उत्तम असे आयोजन केले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.नगर शहरात ३०० महिलांना रिक्षा देणार

नगर शहरात ३०० महिलांना रिक्षा देणार (Ajit Pawar)

ते पुढे म्हणाले की, मुलींना १० वी १२ वी पर्यंत मोफत शिक्षण मिळत आहे, , यासाठी ८ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ होईल. या माध्यमातून मुली उच्च पदावर कार्य करतील. रस्ते, पाणी, आरोग्य या विकास कामांबरोबरच महिलांनी महिलांसाठीच्या योजनेचा लाभ घ्यावा. आता पिंक रिक्षा योजनेसाठी राज्यात १७ शहरांची निवड केली असून यात नगर शहर आहे. येथील ३०० महिलांना रिक्षा दिली जाणार आहे. मुलींसाठी लखपती योजना सुरु असून मुलगी जन्मापासून तिच्या नावे पैसे टाकण्याचे काम सरकारकडून सुरु आहे ती मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर १ लाख १ हजार रुपये मिळणार आहे, या सर्व योजना बजेट मध्ये तरतूद केल्या आहे, सरकार जनतेचे आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे  असे आवाहन करत यावेळी सरकारच्या योजनांची दप्तरीच त्यांनी महिलांना सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here