Maharashtra Budget 2024:शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ होणार

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेची त्यांनी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ (waive electricity bill) करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

0
Maharashtra Budget 2024:शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ होणार
Maharashtra Budget 2024:शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ होणार

नगर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये त्यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेची त्यांनी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ (waive electricity bill) करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अखंडित वीज पुरवठा झाल्याने शेतीला पाणी देण्यासाठी रात्र रात्र जागून काढावी लागणार नाही.

नक्की वाचा : आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज, पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित

४४ लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार (Maharashtra Budget 2024)

महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामधील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील ४४ लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

अवश्य वाचा : गायक सोनू निगमने भर मंचावर धुतले आशा भोसलेंचे पाय

१५००० कोटींच्या प्रकल्पाची घोषणा (Maharashtra Budget 2024)

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरऊर्जा करून करण्याचा १५००० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे अजितदादांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप या योजनेकरिता आठ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले.

उपसा जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणे तसेच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी सांगली जिल्ह्यातील मैसाळ येथे वतदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंदाजीत किंमत १५९४ कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार शेतकरी कुटुंबांना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here