Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki bahin Yojana) राज्याच्या तिजोरीवर ताण आला आहे. पण या योजनेबाबत आम्ही खरं बोललो असतो तर आमचं सरकार आलं नसतं,असं अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली, तेव्हा पैशांचं सोंग आपल्याला करता येणार नाही, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले आहे.
नक्की वाचा : राज्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’राबविली जाणार;महसूल मंत्र्यांचा निर्णय
‘आम्ही काही साधू-संत नाहीत’ (Ajit Pawar)
अजित पवार पुढं म्हणाले की, आम्ही काही साधू-संत नाहीत. आमचंही काही व्हिजन आहे.ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. केंद्रात आमचं सरकार आहे. त्यांची मदत घेऊन राज्याचं उत्पन्न वाढवून आपण मार्ग काढू,असं माझं मन सागंत होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे.
अवश्य वाचा : ‘चंदू चॅम्पियन’मधील भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार
‘आम्ही कुठलीही योजना बंद करणार नाही'(Ajit Pawar)
“आम्ही कुठलीही योजना बंद करणार नाही,असं आधीच सांगितलं आहे. जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारची योजना एकसारखीच असते. तेव्हा आम्ही राज्याची योजना बंद करून केंद्राच्या योजनेचा लाभ घेतो. तसेच केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेचा लाभ घेत आहोत”,असंही अजित पवार म्हणाले.