Ajit pawar:लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार

0
Ajit pawar:लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार
Ajit pawar:लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार

नगर : लाडकी बहीण या योजनेत (Ladki Bahin Yojana)आम्ही दुरुस्ती करणार,मात्र बंद करणार नाही,असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे,असं देखील ते म्हणाले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत (Vidhansbha) हे उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर

लाडकी बहीण योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत (Ajit pawar)


अजित पवार यांनी या उत्तरामध्ये बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या घोषणा केल्या.लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत.लाडकी बहीण योजनेत दुरूस्ती करणार आहोत,पण योजना बंद करणार नाहीत,असं म्हणत त्यांनी योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत दिले. लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणार असल्याचंही ते म्हणाले.

अवश्य वाचा : ‘आरडी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित;२१ मार्चला चित्रपट होणार प्रदर्शित   

अजित पवार पुढे म्हणाले की, या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे.अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो.त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो.१५०० रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल सरकारने उचललं आहे.

महिलांच्या हातात ४५ हजार कोटी जाणार (Ajit pawar)

अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या हातात मोठी रक्कम जाणार असल्याचं म्हटलं. हा थोडाथोडका पैसा नाही. सुमारे ४५ हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल,तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं,मोठं योगदान मिळेल, असं अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here