Ajit Pawar Plane Crash : अजितचं विमान कसं कोसळलं?, बारामतीत पोहचताच शरद पवारांनी घेतली माहिती

Ajit Pawar Plane Crash : अजितचं विमान कसं कोसळलं?, बारामतीत पोहचताच शरद पवारांनी घेतली माहिती

0
Ajit Pawar Plane Crash : अजितचं विमान कसं कोसळलं?, बारामतीत पोहचताच शरद पवारांनी घेतली माहिती
Ajit Pawar Plane Crash : अजितचं विमान कसं कोसळलं?, बारामतीत पोहचताच शरद पवारांनी घेतली माहिती

Ajit Pawar Plane Crash : नगर : अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा (Ajit Pawar) हा अपघाती मृत्यू झाला. यावेळी नवी दिल्लीत असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) थेट बारामती (Baramati) गाठली आणि हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली.

नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?

रन वेवर असतानाच शरद पवारांनी घेतली माहिती

शरद पवार बारामती विमानतळावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून माहिती घेतली. रन वेवर असतानाच शरद पवारांनी ही माहिती घेतली. अजितचं विमान कसं आणि कुठे कोसळलं असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर रन वे ज्या ठिकाणी संपतो त्याच्या आधी एक किमी विमानाचा अपघात झाला. त्या ठिकाणी असलेल्या बाजूच्या खोलगट भागात हा अपघात झाल्याची माहिती शरद पवारांना देण्यात आलं.

पवार कुटुंबीयांची न भरणारी हाणी (Ajit Pawar Plane Crash)

शरद पवार यावेळी काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या अकाली जाण्यामुळे पवार कुटुंबीयांची न भरणारी हाणी झाल्याचं म्हटलं जातंय. यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अश्रूचा बांध फुटल्याचं दिसून आलं.

अपघात नेमका कसा झाला?

1. सकाळी 8.10 मिनिटं

मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.

2. सकाळी 8.40 मिनिटं

विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.

3. सकाळी 8.46 मिनिटं

तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला.

विमानात कोण कोण होते?

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

विमान अपघाताचा घटनाक्रम

पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.
त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
स्फोटांमुळे विमानात भीषण आग लागली.
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.