Ajit Pawar:’छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समावेशक होते’;अजित पवारांनी खोडला संभाजी भिडेंचा दावा

0
Ajit Pawar:'छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समावेशक होते';अजित पवारांनी खोडला संभाजी भिडेंचा दावा
Ajit Pawar:'छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समावेशक होते';अजित पवारांनी खोडला संभाजी भिडेंचा दावा

गर :  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते’,असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं. आता संभाजी भिडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे.“छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते”,असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा : धक्कादायक! महाराष्ट्रीयन तरुणीची बंगळुरूत हत्या;सुटकेसमध्ये आढळला मृतदेह 

‘संभाजी भिडे काही बोलू शकतात’ (Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, संभाजी भिडे काही बोलू शकतात.मात्र,सत्य हे आहे की,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्व धर्म आणि जातीचे लोक होते. ते एक आदर्श राजा होते. तसेच ते सर्वसामान्य रयतेचे राजा होते. एवढंच नाही तर सर्वांनीच त्यांचं नेतृत्व राजा म्हणून स्वीकारलं”,असं अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.

अवश्य वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरण;सुदर्शन घुलेनी दिली खून केल्याची कबुली  

‘सामाजिक तेढ निर्माण होईल अशी विधाने करू नये’ (Ajit Pawar)

“सरकारमध्ये असो वा विरोधी पक्षात,राजकीय नेत्यांनी सामाजिक तेढ निर्माण होऊ नये,यासाठी विधाने करताना काळजी घेतली पाहिजे.महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकि‍र्दीत देखील अनेक मुस्लिमांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र,अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या विधानांच्या मागचा हेतू मला समजलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती किंवा पंथाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला नाही”,असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here