Ajit Pawar:’माझी राजकीय भूमिका पवार साहेबांच्या संमतीनेच’-अजित पवार

0
Ajit Pawar:'माझी राजकीय भूमिका पवार साहेबांच्या संमतीनेच'-अजित पवार
Ajit Pawar:'माझी राजकीय भूमिका पवार साहेबांच्या संमतीनेच'-अजित पवार

Ajit Pawar: आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांच्या संमतीने आणि त्यांना विचारुनच घेतलाय,असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. बारामतीतल्या (Baramati) डॉक्टर मेळाव्यात (Doctor Meet) ते बोलत होते. तसेच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो,असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

नक्की वाचा : कोणत्याच पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नाही : देवेंद्र फडणवीस

अजित पवार म्हणाले की, मला राजकीय भूमिका घ्यावी लागली ती साहेबांना विचारून घेतली. ते सुरुवातीला हो म्हणाले परत म्हणाले की ही, भूमिका मला घेता येणार नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पुढे गेलो. पण हे सगळे होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही. कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत.

अवश्य वाचा : अमृत भुयारी गटार योजनेमुळे सीना नदी स्वच्छ :संग्राम जगताप

‘स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे’- अजित पवार’ (Ajit Pawar)

सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायला लागलेत. कधी न दिसणारे परंतु आता साड्या द्यायला लागले, स्टीलची घमेले द्यायला लागले, डबे द्यायला लागले. ते म्हणतात ना  पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असते, पण एकदा का काही… सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे,असे अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.

‘सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक’ (Ajit Pawar)

आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, मी मधल्या काळात पक्क ठरवलं होतं की बास झाले आता. पण  कधी ना कधी थांबावं लागते, पण लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागतात. तसेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी मान्य केली. आता मागचे सर्व विसरुन पुढे जायचे, असे अजित पवार म्हणाले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here